sridevi, sridevi death anniversary, sridevi death, sridevi family SAKAL
मनोरंजन

Remembering Sridevi: बोनी कपूर यांनी शेयर केला श्रीदेवीचा शेवटचा फोटो, मृत्यूपूर्वी 'अशी' होती अवस्था

श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा शेवटचा फोटो पोस्ट केलाय.

Devendra Jadhav

Sridevi Death Anniversary: आज प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची पुण्यतिथी. प्रत्येक भारतीयाला श्रीदेवी सोबत एक वेगळा कनेक्ट जाणवतो. त्याच नात्याने सगळेजण श्रीदेवीला प्रेमाने एकेरी नावानेच हाक मारतात.

सर्व काही छान सुरु असताना श्रीदेवीची अचानक झालेली एक्झिट चटका लावून गेली. आजही श्रीदेवीच्या निधनाचं दुःख कमी झालं नाही. अशातच श्रीदेवीचे पती आणि प्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा शेवटचा फोटो पोस्ट केलाय.

(Boney Kapoor shared Sridevi's last photo)

श्रीदेवीचे २४ फेब्रुवारी 2018 मध्ये दुबईत निधन झाले. त्यावेळी श्रीदेवी एका कौटुंबिक लग्नात सहभागी झाली होती. फोटोमध्ये बोनी कपूर, श्रीदेवी आणि त्यांची धाकटी मुलगी खुशी कपूर दिसतेय. बोनी कपूरची बहीण रीना कपूरही या फोटोत दिसतेय.

श्रीदेवी या फोटोत प्रचंड खुश दिसतेय. लग्नसोहळ्यात सहभागी झाल्याने श्रीदेवी सर्वांसोबत आनंदी दिसतेय. या क्षणांनंतर काही तासातच श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. बोनी कपूर यांनी कॅप्शनमध्ये, “शेवटचा फोटो…” एवढंच लिहिलं आहे.

याशिवाय काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी दिवंगत पत्नी श्रीदेवीच्या स्मरणार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.

श्रीदेवीचा एक खास फोटो शेयर करून त्यांनी लिहिलंय कि, "तु आम्हाला 5 वर्षांपूर्वी सोडून गेलीस... तुझे प्रेम आणि आठवणी कायम आमच्यासोबत राहतील..." अशा शब्दात भावुक होऊन बोनी कपूर यांनी श्रीदेवीची आठवण जागवली आहे.

श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झालेली दिसली.

“मम्मा अजूनही मी तुला सर्वत्र शोधत आहे, तरीही तुला माझा अभिमान वाटेल या आशेने मी काम करत असते. मी कुठेही जाते, आणि मी जे काही करते - ते तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशीच संपते." अशा शब्दात जान्हवीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.

एकूणच संपूर्ण कपूर कुटुंब श्रीदेवीच्या स्मरणार्थ प्रचंड दुःखी झालेले दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा श्रीदेवीच्या पुण्यतिथी निमित्त तिच्या सुंदर आठवणींचं स्मरण केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT