Bholaa  Sakal
मनोरंजन

Bholaa BO Prediction: भोला पठाणचा रेकॉर्ड मोडू शकेल का? जाणून घ्या पहिल्या दिवशी किती होईल कमाई

अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा शेवटचा चित्रपट 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने अजयच्या चाहत्यांना खूप आनंद दिला. अभिनेत्याचे चाहतेही बऱ्याच दिवसांपासून 'दृश्यम 2' ची वाट पाहत होते.

आता पुन्हा एकदा अजय देवगणच्या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. आज अजयचा 'भोला' चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

त्याचवेळी 'भोला'च्या आधी शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची आग सर्वांनी पाहिली. या चित्रपटाने ते केले जे आजपर्यंत बॉलीवूडचा कोणताही चित्रपट करू शकला नाही. आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या 'भोला'वर खिळल्या आहेत.

'भोला' शाहरुखच्या पठाणला टक्कर देऊ शकेल का, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. या प्रश्नासोबतच तब्बू आणि अजय स्टारर 'भोला' पहिल्या दिवशी किती कमाई करू शकेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

'भोला' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता अजय देवगावचा चित्रपट पहिल्याच दिवशी चांगले कलेक्शन करू शकतो, असे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'भोला' पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटींची कमाई करू शकतो.

मात्र, 'भोला'पूर्वी 'तू झूठी मैं मक्कार'नेही पहिल्याच दिवशी 15 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. रणबीर कपूरच्या चित्रपटाला मागे टाकण्यासाठी 'भोला'ला 15 कोटींहून अधिकचा व्यवसाय करावा लागणार आहे.

आज भोलासोबतच नानीचा दसरा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. अशा स्थितीत या दोन चित्रपटांमध्येही टक्कर आहे. 'भोला' हा तमिळ चित्रपट कैथीचा हिंदी रिमेक आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. तब्बूचा खाकी अवतार पुन्हा एकदा भोलामध्ये दिसणार आहे. तर अजय यावेळी अँग्री मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT