Flop Bollywood tabbu reaction  esakal
मनोरंजन

Flop Bollywood: 'आपले पैसे कुठे जातात? टेन्शन घ्यायचं नाही', तब्बुचं अजब विधान

कोरोनानंतर मनोरंजन विश्वाची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. त्यातही बॉलीवूडच्या वाट्याला येणारं अपयश हे निर्माते आणि (bollywood news) दिग्दर्शकांना सलत आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Movies: कोरोनानंतर मनोरंजन विश्वाची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. त्यातही बॉलीवूडच्या वाट्याला येणारं अपयश हे निर्माते आणि (bollywood news) दिग्दर्शकांना सलत आहे. टॉलीवूडच्या चित्रपटांकडून होणारी भरघोस कमाई बॉलीवूडच्या चिंतेचे कारण आहे. गेल्या वर्षी अल्लु अर्जुनच्या (bollywood vs tollywood) पुष्पापासून सुरु झालेला हा प्रवास कमल हासन यांच्या विक्रमपर्यत जोरदार सुरु आहे. अशावेळी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलीवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बुनं देखील बॉलीवूडला येणारं सततचं अपयश पाहून कलाकारांना एक सल्ला दिला आहे. तिचं ते विधान सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून तब्बुचे नाव घेतले जाते. आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं तिनं स्वताची छाप बॉलीवूडमध्ये उमटवली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु झाला आहे. त्यात बॉलीवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा थंड आहे. तुलनेनं टॉलीवूडच्या चित्रपटांना मिळालेला यश हे नजरेत भरणारं आहे. अशावेळी बॉलीवूडच्या खान कलाकार मंडळींनी देखील चिंता व्यक्त केली होती. सध्या आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर बहिष्काराची मागणी घालण्यात आली आहे.

बॉक्स ऑफिसवर तब्बुचा भुलभुलैय़्या 2 यशस्वी झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यासगळ्यात तब्बुनं केलेलं विधान चर्चेत आलं आहे. ती म्हणते, मला माहिती आहे की, बॉलीवूडवर नेटकऱ्यांचा, प्रेक्षकांचा राग आहे. अशावेळी कलाकारांनी कोणतंही टेन्शन घेऊ नये. त्यांनी या गोष्टीचा फार विचारही करु नये. याचे कारण आपले पैसे काही जात नाही. आपल्याला आपलं मानधन मिळतं. आपलं काम व्यवस्थित असलं आणि चित्रपट चांगला असला की बाकी बोलण्याची गरज नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया तब्बुनं दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ तब्बु ही बॉलीवूडमध्ये सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. एका मुलाखतीमध्ये तिला एका अभिनेत्याची ब्रँड व्हॅल्यु आणि बॉक्स ऑफिसच्या माध्यमातून त्याची प्रोग्रेस जाणून घेण्यासाठीची प्रोसेस काय आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आला तेव्हा तिनं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सगळ्यांना फायदा होतच असतो. मात्र जेव्हा तो फ्लॉप होतो तेव्हा मला माहिती नाही की, कुणाला किती नुकसान होते, असं तब्बु म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT