Boycott Pathaan Minister Narottam Misra Deepika Padukone Esakal
मनोरंजन

Boycott Pathaan: "दिपिकाची भगवी बिकीनी सहन करणार नाही",मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा भडकले...

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या चित्रपटातलं 'बेशरम रंग' हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. #BoycottPathan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. यामध्ये लोक गाण्याबद्दल वाइट साइट कमेंट करत आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचं बेशरम रंग ही गाण्याला ट्रोल केलं जात आहे.

दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. त्याचवेळी या गाण्यावर जैन यांच्या मरिबा गाण्याची धून चोरल्याचा आणि डान्स स्टेप्स चोरल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये त्याच्या प्रदर्शन अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असं सांगितले आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नरोत्तम मिश्रा काय म्हणाले

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, 'गाण्यात वापरण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणं चित्रित करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. दीपिका पदुकोण जेएनयू प्रकरणात तुकडे-तुकडे गँगमध्ये समर्थक आहेत. या कारणास्तव, मी विनंती करेन की दृश्ये आणि वेशभूषा निश्चित करा, अन्यथा मध्य प्रदेशात या चित्रपटाला परवानगी मिळणार की नाही, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे.'

बॉयकॉट पठाण हॅशटॅगचे समर्थन करताना भाजप नेते अरुण यादव यांनीही शाहरुखवर हल्लाबोल केला आहे. इतर काही वापरकर्त्यांनी भागवावर चित्रपटाचे नाव, दीपिकाचा ड्रेस आणि गाण्याचे बोल जोडून तिची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT