Boycott Pathaan Sakal
मनोरंजन

Boycott Pathaan : 'बहिष्कार टाकावा इतका हलका नाही..'; 'पठाण' वादात SRK चा व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाच्या 'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीने राजकारण्यांपासून हिंदू संघटनांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Boycott Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने राजकारण्यांपासून हिंदू संघटनांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

या सर्व वादात आता 'बॉयकॉट पठाण' असा ट्रेंड सुरू झाला आहे. देशभरात या चित्रपटाला जोरदार विरोध केला जात आहे. तर, दुसरीकडे अनेक संघटनांनी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

देशभरात मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि त्यातील गाण्यावरून गदोरोळ सुरू असतानाच शाहरूख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किंग खानची बेधडक शैली पाहायला मिळत आहे.

बॉयकॉट पठान ट्रेंडमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये शाहरूख खान "इतना हल्का नहीं हूं मैं, की बॉयकॉट ट्रेंड की हवा से हिल जाऊं" असे सांगताना दिसून येत आहे. व्हायरल होणारा शाहरूखचा हा व्हिडिओ जुना असून, एका मुलाखतीदरम्यान त्याने वरील विधान केले होते. मात्र, सध्याच्या पठान वादावर त्याचे हे वाक्य अगदी तंतोतंग जुळून येत आहेत.

कोलकाता येथे दिली होती प्रतिक्रिया

दरम्यान, पठान चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान शाहरूखने कोलकाता येथील कार्यक्रमात या प्रकणावर पहिली प्रतिक्रिया दिली होती. ज्यामध्ये त्याने जग काहीही करू शकते, पण जोपर्यंत सकारात्मक लोक जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही, 'जग काहीही करू शकते यावर माझा अजिबात आक्षेप नाही... पण मी आणि तुम्ही आणि सर्व सकारात्मक लोक... जिवंत आहोत.' असे विधान किंग खानने केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT