Boycott Pathan Sushant singh rajput Esakal
मनोरंजन

Boycott Pathan: सुशांतच्या चाहत्यांमूळं शाहरुखच्या 'पठाण'चा होतोय वाद?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड आभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्यातच सोमवारी रिलिज झालेल्या 'पठाण' मधील 'बेशरम रंग' या नवीन आणि पहिल्या गाण्याची सर्वत्र चर्चेत आहे.या गाण्याचे व्ह्यूज काही वेळातच लाखांवर पोहोचले होते.

त्या गाण्यातील दिपिकाचे कपडे त्याचा रंग आणि तिची डान्स स्टेप यावरुन जोरदार राडा सुरु आहे. त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही सुरू झाली आहे. #BoycottPathan हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. लोक गाण्याबद्दल वाइट साइट कमेंट करत बेशरम रंग गाण्याला ट्रोल केलं जात आहे.

त्यानंतर यूजर्सने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते ट्विटरवर 'बॉयकॉट पठाण' ट्रेंड करत आहेत. तसेच दीपिका पदुकोणच्या गाण्यातील लूकवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या सगळ्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनीही ट्विट करत पठाणवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू केली आहे. पठाण यांच्यावर बॉलीवूडसह बहिष्कार टाकावा लागेल, असे सांगू लागले. सुशांतला न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली.

सध्या ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये 'बॉयकॉट पठाण' हा ट्रेंड आहे. यूजर्स या गाण्यावर जोरदार टीका करत आहेत. एवढेच नाही तर या गाण्यातील शाहरुख आणि दीपिका यांचीही बदनामी केली जात आहे. युजर्स गाण्यात दाखवण्यात आलेले सीन आणि आउटफिट या दोन्ही गोष्टींबद्दल ट्रोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT