Boycott Pathaan Movie esakal
मनोरंजन

Boycott Pathaan Movie: 'पठाणचा एकही शो प्रदर्शित होऊ देणार नाही' भाजप आक्रमक

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा चित्रपट येणार म्हटल्यावर त्यावर वाद होणं नित्याचे झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Boycott Pathaan Trending now Madhya Pradesh minister remark : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा चित्रपट येणार म्हटल्यावर त्यावर वाद होणं नित्याचे झाले आहे. त्याच्या गेल्या काही चित्रपटांना नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. आता त्याचा पठाण नावाचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

पठाण मधील शाहरुख आणि दीपिकाचे ते बेशरम नावाचे गाणे प्रदर्शित झाले. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे काही हिंदू संघटनांनी म्हटले होते. त्यात या चित्रपटानं धार्मिक भावना भडकावल्याचा आरोपही सोशल मीडियावरुन केला जात आहे. नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

Also Read- प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पठाणवर नाराजी व्यक्त केली आहे. इंदोरमध्ये पठाणच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी मिश्रा यांनी काही झालं तरी पठाणचा एकही शो प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका भाजपच्या मिश्रा यांनी घेतली आहे. दीपिकाचा बोल्डनेस, तिचं बिकीनी परिधान करणे, त्यातही ती भगव्या रंगाची परिधान करुन गाणे म्हणणे हा नेटकऱ्यांच्या रागाचा विषय झाला आहे.

पठाण मधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे येत्या काळात निर्मात्यांनी त्यातील वादग्रस्त प्रसंग काढून न टाकल्यास आम्ही तो चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका मिश्रा यांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या रोमान्स सीन्सवर देखील दुबईमधील व्यक्तींनी आक्षेप घेतल्याचे दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT