boyz 3 marathi movie teaser out vidula chaugule is lead actress in boyz3 sakal
मनोरंजन

'बॉईज ३' मधील 'ती'चा चेहरा आला समोर, टीझर पाहून तुम्हालाही बसेल धक्का..

‘बॅाईज ३’च्या निमित्ताने अभिनेत्री विदुला चौगुले चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.

नीलेश अडसूळ

boyz 3 movie : 'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या धमाल त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. आणि त्यात दोन्ही पर्वामध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला. प्रत्येक वेळी यात हॅण्डसम कबीरनेच बाजी मारली. ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला असून विदुला चौगुले ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विदुला ‘बॅाईज ३’च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता ही विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (boyz 3 marathi movie teaser out vidula chaugule is lead actress in boyz3 nsa95)

काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येणार याची? तिच्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड होणार की त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाणार? अर्थात या सगळ्यांची उत्तरे ‘बॅाईज ३’ पाहिल्यावरच मिळतील.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले चित्रपटगृहात दंगा घालायला येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीचं द्विशतक हुकलं, पण फायनलमध्ये 'असा' पराक्रम करणारा पहिला जगातील पहिलाच क्रिकेटर

BEST Bus: अतिरिक्त बस अन् पुढच्या दारातून प्रवेश, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाची मोठी घोषणा

Viral Video: मेट्रो स्टेशनवरच पार पडला साखरपुडा! प्रेमाची ही अनोखी स्टाइल पाहून सगळेच थक्क

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेचा ठरला महापौर

Bigg Boss Marathi 6 : आयुष की ओमकार; कुणावर आहे एलिमिनेशनची टांगती तलवार ? जाणून घ्या अखेरचे वोटिंग ट्रेंड्स

SCROLL FOR NEXT