Boyz 4 diwali offer  SAKAL
मनोरंजन

Boyz 4: दिवाळीची खास ऑफर! गौरव मोरेचा बॉईज 4 पाहा आता फक्त .. रुपयात

गौरव मोरेच्या बॉईज 4 सिनेमाची स्पेशल दिवाळी ऑफर बघा

Devendra Jadhav

Boyz 4 Diwali Offer News: गौरव मोरेचा बॉईज 4 सिनेमा काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांचा भेटीला आलाय. धम्माल कॉमेडी असणाऱ्या या सिनेमाची उत्सुकता शिगेला होती.

बॉईज सिनेमाचे याआधीचे तिनही भाग यशस्वी झालेत. त्यामुळे बॉईज 4 पाहायला सुद्धा लोकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली.

अशातच अजुनही ज्यांनी बॉईज 4 पाहिला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. बॉईज 4 सिनेमाची दिवाळीनिमित्त खास ऑफर आहे. काय आहे ती ऑफर? जाणुन घ्या.

बॉईज 4 ची दिवाळीनिमित्त खास ऑफर

बॉईज 4 सिनेमाने दिवाळीनिमित्त लोकांसाठी खास ऑफर आणली आहे. दिवाळी स्पेशल ऑफर! एजॉय करा बॉईज४ आता फक्त रु ९९/ - मध्ये...

अशी घोषणा करत बॉईज 4 सिनेमा प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयात बघायला मिळणार आहे. त्यामुळे बॉईज 4 सिनेमा ज्यांनी पाहिला नाही त्यांना सिनेमा ९९ रुपयात बघायची खास संधी आहे.

बॉईज 4 ची बॉक्स ऑफीस कमाई

बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट 'Boyz4' ची धमाकेदार कमाई.. असं कॅप्शन देत बॉईज 4 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय.

गेल्या १० दिवसात बॉईज 4 ने ४.२० कोटीची कमाई केलीय. त्यामुळे बॉक्स ऑफीसवरील कमाई बघता बॉईज 4 लोकांना आवडत असुन सुपरहिट झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बॉईज 4 मध्ये असलेले कलाकार

'बॉईज ४' सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. या सिनेमात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत.

याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT