boyz 4 marathi movie onkar bhojane and gaurav more will seen together after maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Boyz 4: हास्यजत्रा फेम गौरव मोरे - ओंकार भोजने पहिल्यांदाच एकत्र, बॉईज 4 मध्ये करणार धम्माल

गौरव मोरे - ओंकार भोजने पहिल्यांदाच एकत्र आगामी मराठी सिनेमात काम करणार आहेत

Devendra Jadhav

Boyz 4 Marathi Movie News: मराठी मनोरंजन विश्वात असे सिनेमे आहेत ज्यांचे सिक्वेल प्रेक्षकांना तुफान आवडले. आधीच्या सिनेमांपेक्षाही या सिनेमांचे सिक्वेल प्रेक्षकांना प्रचंड आवडले. दगडी चाळ, टाईमपास, दे धक्का या सुपरहिट मराठी सिनेमांचे सिक्वेल आधीपेक्षा लोकप्रिय झाले.

अशाच एका गाजलेल्या फ्रॅंचायझीचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे बॉईज 4. आणि विशेष गोष्ट म्हणजे हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि ओंकार भोजने या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

बॉईज 4 सिनेमाची घोषणा

बॉईज 4 सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. 'बॉईज'च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी बॉईज 4 च्या माध्यमातुन धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे.

विशेष गोष्ट म्हणजे याही सिनेमात नरू भोंडवेच्या भुमिकेत ओंकार भोजने झळकणार आहे. आणि यावेळी ओंकार भोजने सोबत गौरव मोरे दिसणार अशी चर्चा आहे. गौरव मोरेने नवीन सिनेमा अशी पोस्ट करुन बॉईज 4 ची घोषणा केलीय. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. याशिवाय हास्यजत्रा फेम निखील बने आणि अभिनेता अभिनय बेर्डे बॉईज 4 मध्ये काम करणार आहेत.

कधी होणार बॉईज 4 रिलीज?

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' धमाका करायला येत आहेत. नुकतेच 'बॉईज ४'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून 'आपण येणार तर धमाका होणार' अशी टॅगलाईन पोस्टरसाठी वापरण्यात आलीय.

'बॉईज ४' येत्या २० ऑक्टोबरला सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ४' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Latest Marathi News Live Update: खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT