British Paints Event esakal
मनोरंजन

British Paints Event : जयपूरमध्ये पार पडला ब्रिटिश पेंट्स "म्युझिकल स्टार नाईट 2.0" चा अविस्मरणीय सोहळा

Pooja Karande-Kadam

British Paints Event : ब्रिटिश पेंट्स पेंट उद्योगातील एक अग्रगण्य नाव आहे. अलीकडेच 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान जयपूर, राजस्थान येथील प्रतिष्ठित ताज आमेर येथे उत्साही "म्युझिकल स्टार नाईट 2.0" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे शहर उत्कृष्ट सेलिब्रिटींच्या चमकदार परफॉर्मन्सचे साक्षीदार बनले

"म्युझिकल स्टार नाईट 2.0" हा एक अविस्मरणीय कार्यक्रम होता. जिथे ब्रिटिश पेंट्सने आपल्या ग्लॅमर मिस्टिक अँटी स्टेन इंटिरियर इमल्शनच्या लाँचिंगचा सोहळा साजरा केला. या कार्यक्रमाने सर्व उपस्थितांसाठी एक वेगळा अनुभव देणारे सिनेस्टार आणि पेंट डीलर्सच्या ग्रूपला एकत्र आणले.

ग्लॅमर आणि मनोरंजनाने भरलेल्या या संध्याकाळची सुरूवात नेहा कक्करच्या सुरेल गाण्यांनी झाली. तर शमिता शेट्टीने तिच्या आकर्षक नृत्याने सर्वांना तालावर थिरकायला लावले. कृष्णा अभिषेक आणि राजीव ठाकूर यांच्या कॉमेडी स्कीटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सोनाली राऊतने तिच्या मोहक अदांनी प्रेक्षकांची मनं घायाळ केली. तर, खुशबू ग्रेवालच्या दमदार अभिनयाने सर्वांचेच डोळे दिपून गेले.

ब्रिटीश पेंट्सचे अध्यक्ष योगेश भाटिया यांनी या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, “हा कार्यक्रम आमच्या उत्पादनांच्या लाँचचा उत्सव साजरा करण्यासाठी, आणि आमच्या डीलर भागीदार, त्यांच्या कुटुंबियांसोबत अविस्मरणीय आठवणींसाठी एकत्र राहण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. जे त्यांना आमच्याशी घट्ट नातं निर्माण करण्यात महत्त्वाचा दुवा बनले.

या कार्यक्रमासाठी 400 हून अधिक डीलर उपस्थित होते. ज्यांच्यासोबत आम्ही आनंदाचे क्षण एकत्र शेअर केले. आमच्या भविष्यातील उत्पादनांचे लॉन्च आणि योजनांचे अनावरणही केले. आमच्या डीलर भागीदारांचा उत्साहवर्धक प्रतिसाद पाहून आम्ही भविष्यातही असे कार्यक्रम करत राहू,असा विश्वासही भाटिया यांनी व्यक्त केला.

स्टार्सच्या परफॉर्मन्सच्या व्यतिरिक्त, इव्हेंटमध्ये डीलर्ससाठी एक विशेष ट्रिप देखील आयोजित केली होती. सहभागींना जयपूरची संस्कृती, समृद्ध वारसा आणि स्थापत्यकलेचे बांधकाम अविष्कार पाहण्याची संधी मिळाली. ज्यामुळे त्यांचा अनुभव आणखी वाढला. ग्लॅमर मिस्टिक अँटी स्टेन इंटिरियरच्या लाँचिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डीलर्सना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 

या कार्यक्रमाने देशाच्या अनेक भागातील लोक एकत्र आले. ज्यांनी ब्रिटीश पेंट्ससोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांच्यासाठी ही संध्याकाळ नवी उर्जा देणारी ठरली. मनमोहक परफॉर्मन्स आणि आकर्षक गेम्सच्या पलीकडे जाऊन या मेळाव्याने कंपनी आणि डिलर्समध्ये अतूट असे नाते निर्माण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT