Britney Spears Britney Spears files police report after being smacked in face by NBA star Victor Wembanyama's security  Esakal
मनोरंजन

Britney Spears: पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सने केली प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू विरोधात तक्रार दाखल! काय आहे प्रकरण..

Vaishali Patil

हॉलिवूडची पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. बुधवारी रात्री लास वेगासमध्ये ब्रिटनी स्पीयर्स आणि एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामा यांच्यात राडा झाला.

(Britney Spears files police report after being smacked in face by NBA star Victor Wembanyama's security)

जेव्हा ब्रिटनी स्पीयर्स ही बास्केटबॉल खेळाडूसोबत फोटो काढण्यासाठी गेली तेव्हा वेम्बन्यामाच्या सुरक्षा टीमच्या सदस्याने तिच्यावर हल्ला केला होता. त्याने तिच्या चेहऱ्यावर पाठीमागून वार केला. यामुळे तिचा फॅन मुव्हमेंटही खराब झाला. त्यानंतर ब्रिटनी स्पीयर्सने एनबीए स्टार व्हिक्टर वेम्बन्यामाच्या सुरक्षा टिममधल्या सदस्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत स्पीयर्सने लास वेगास, नेवाडा येथे पोलिसात तक्रार दाखल केली.

तिने सांगितले की, 'रात्री माझ्यासोबत जे घडले त्यासाठी मी तयार नव्हतो," स्पीयर्सने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लिहिले की तिने वेम्बन्यामाला तिच्या हॉटेलच्या लॉबीमध्ये ओळखले आणि त्याला लास वेगासच्या एका रेस्टॉरंटमध्ये पाहिले जेथे ती जेवत होती आणि त्याच्याकडे जावुन त्याचे अभिनंदन करण्यासाठी जात होते. तेव्हा बास्केटबॉल खेळाडूच्या सुरक्षारक्षकाने तिच्यावर हल्ला केला आणि माझा चष्माही पडला आणि तिला खालीच पाडले. '

आता तिने याप्रकरणीचे तिच्या चेहऱ्याचे नुकसान केले आणि तिच्यावर हल्ला चढवला असा आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. आता पोलिसांनी सांगितले आहे की ते या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली आहे आणि कोणालाही अटक केलेली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT