Andre Braugher Esakal
मनोरंजन

Andre Braugher: एमी-विजेता अभिनेता आंद्रे ब्रूघेरचे निधन! 61 व्या घेतला अखेरचा श्वास

अभिनेता आंद्रे ब्रूघेर याचे सोमवारी निधन झाले.

Vaishali Patil

Andre Braugher Death: "होमिसाइड: लाइफ ऑन द स्ट्रीट" आणि "ब्रुकलिन 99" या सिरिजमधील महत्वाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आंद्रे ब्रूघेर याचे सोमवारी निधन झाले. त्याने वयाच्या 61 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आंद्रे हा एमी-विजेता होता. आंद्रेच्या पीआर जेनिफर ऍलन यांने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आंद्रेच्या निधनाने मनोरंजन विश्वासवर शोककळा पसरली आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली देत आहेत.

आंद्रेचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. त्याने 'ग्लोरी'मध्ये मॉर्गन फ्रीमन आणि डेन्झेल वॉशिंग्टन यांच्यासोबत काम केले होते. या दोघांनी ऑल-ब्लॅक आर्मी रेजिमेंटवरच्या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकला होता.

हॉलीवूडमध्ये काम शोधण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याने वेगेवगळ्या भुमिकांमधून अभिनय केला.

अँडी सॅमबर्ग अभिनीत फॉक्स मालिका “ब्रुकलिन नाईन-नाईन” मधील कॅप्टन रे होल्टच्या भूमिकेतून तो कॉमेडीकडे वळला.याचे 2013 ते 2021 पर्यंत आठ सीझन आले होते.

आंद्रेने 11 नामांकनांमधून आपल्या करिअर दोन एमी पुरस्कार जिंकले होते. त्याने ब्रॅबसनशी लग्न केले होते. त्यांना तीन मुलगे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT