BTS Suga Announce Military Enlistment: Esakal
मनोरंजन

BTS Suga: "मी जिंवत..," BTS ग्रुपच्या सुगानं संगीत जगताला ठोकला रामराम! आता देशासाठी...

Vaishali Patil

BTS Suga Announce Military Enlistment: जगभरात प्रसिद्ध म्युझिकल बँड बीटीएसचा सोशल मीडियावर प्रचंड प्रभाव आहे. गायकांच्या गाण्यांपासून तर त्याच्या फोटो आणि व्हिडिओपर्यंत ते यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर चर्चेत राहतात. बीटीएस बँडने आपल्या संगीताने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.

आता एक मोठी बातमी समोर आली आहे ज्याने चाहत्यांची निराशा केली आहे. आता या प्रसिद्ध बँडचा लोकप्रिय सदस्य असलेल्या सुगानं संगीत जगताला तात्पुरतं अलविदा म्हटलं आहे. खुद्द सुगा ही माहीती त्याच्या चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

सूगाने काही काळापूर्वी लाईव्ह सेशल घेतले आणि यात त्याने चाहत्यांचा निरोप घेतला. या व्हिडिओत तो म्हणाला की, 'मी जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलोय. यात रडावं असं काही नाही. शेवटच्या कॉर्नर्स्टनंतर माझ्या शरीरात खुप वेदना होत्या. यामुळे मी बराच वेळ विश्रांती घेतली. मी माझ्या कुटुंबासोबत काही वेळ घालवला. त्यातही मी काम करत राहिलो.'

यात पुढे सूगा म्हणाला की तो आता सैन्यात भरती होणार आहे. त्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो 2025 साली पुनरागम करेल. पुढिल दोन वर्ष तो या ​​बीटीएस बँडचा भाग राहणार नाही याचे त्याला खुप वाईट वाटतेय. त्याचबरोबर त्याचे काही तयार झालेले गाणे पुढिल काही काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतील. निरोप घेतांना त्याने तो पुन्हा परत येईल असे वचन चाहत्यांना दिले.

दक्षिण कोरियामधील कायद्यानुसार, 18-28 वयोगटातील सर्व पुरुषांना 18 ते 21 महिन्यांसाठी सैन्यात सेवा देणे आवश्यक आहे. सर्व BTS सदस्यांना वयाच्या 30 व्या वर्षी त्यांची लष्करी सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

'BTS' ने 2013 मध्ये संगीत उद्योगात एंट्री केला आणि तेव्हापासून ते जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य करतात. बीटीएस बॉय सूगाने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यात ‘बटरफ्लाई’, ‘बटर’, ‘ओह’, ‘फायर’ ‘स्प्रिंग डे’ ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT