Mangal Dhillon Death Esakal
मनोरंजन

Mangal Dhillon Death: बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचे कॅन्सरने निधन

Vaishali Patil

जुनून आणि बुनियाद फेम दिग्गज अभिनेते मंगल ढिल्लन यांची रविवारी कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली. काही दिवसांपासून ते लुधियानाच्या रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

उपचारादरम्यान त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिली. अभिनेता यशपाल शर्मा यांनी फेसबुकवर ही बातमी शेअर केली की, “मंगल ढिल्लन जी. RIP."

मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होतं. याशिवाय त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर ते मनोरंजनाच्या दुनियेत सक्रिय राहिले.

'दयावान', 'दिल तेरा आशिक', 'दलाल', 'विश्वात्मा' यांसारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले होते. 

याशिवाय त्याने अनेक हिट टीव्ही शोमध्येही काम केले होते. 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'तुफान सिंग' या चित्रपटात ते मोठ्या पडद्यावर शेवटचे दिसले. 

मंगल ढिल्लन यांनी देखील दिग्दर्शनात काम केले आहे आणि ते आध्यात्मिक प्रेरक देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रकार रितू ढिल्लन असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT