Burj Khalifa Adds Sparkle to His Celebration 
मनोरंजन

शाहरुखला दुबईतून ''खास गिफ्ट''; बुर्ज खलिफावर झळकला ‘किंग खान'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान असणा-या शाहरुखची भारताबाहेर असणारी प्रसिध्दी मोठी आहे. चीनमध्येही त्याचे सिनेमे पाहिले जातात. नुकतेच त्याच्या डीडीएलजे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला होता. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दुबईतून त्याला एक खास गिफ्ट मिळालं आहे.

जगातील सर्वाधिक उंचीचा टॉवर म्हणून बुर्ज खलिफाचे नाव घेतले जाते. दुबईमध्येही शाहरुखचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्ताने बुर्ज खलिफावरने त्याला एक अनोखे सरप्राईज दिले आहे. ते म्हणजे, जगातल्या या सर्वात उंच इमारतीवर शाहरुखसाठी विशेष रोषणाई करण्यात आली होती. तसेच त्याचा एक फोटो या इमारतीवर दिसून आला आहे. सोमवारी शाहरुखने त्याचा ५५ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यामुळे सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्याला विविध माध्यमातून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.

याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना शाहरुख म्हणाला, “जगातल्या सगळ्यात उंच मोठ्या स्क्रीनवर स्वत:चं छायाचित्र पाहणे आनंददायी आहे. माझे मित्र मोहम्मद अलावर (Developer of Burj Khalifa and the Dubai Mall) यांनी माझ्या आगामी चित्रपटापूर्वीच ही मोठी स्क्रीन भेट म्हणून दिली. धन्यवाद बुर्ज खलिफा आणि दुबई, माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल”, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केला आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याला जगभरातून  शुभेच्छा मिळाल्या आहेत. मात्र बुर्ज खलिफाची न्युज प्रसिध्द झाल्यानंतर सोशल मीडियापर्यंत सर्व ठिकाणी शाहरुखचीच चर्चा होती.

शाहरुख खानचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोषणाई करत बॉलिवूडच्या या बादशाहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  यात महत्वाची बाब म्हणजे शाहरुख हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे, ज्याचे नाव या इमारतीवर लिहिले गेले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT