Bus Carrying 'Pushpa 2' Artistes Meets With Accident In Nalgonda Dist Telangana sakal
मनोरंजन

Pushpa 2 Bus Accident: 'पुष्पा 2' चित्रपटाच्या बसला अपघात.. दोन कलाकार जखमी..

तेलंगणा येथील शूटिंग संपवून घरी जाताना बस धडकली..

नीलेश अडसूळ

Pushpa: The Rule:  अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा-द राइज' हा चित्रपट तूफान चालला. केवळ टॉलीवुडच नाही तर बॉलीवुडचेही डोळे फिरले अशी विक्रमी कमाई या चित्रपटाने केली.

त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच 'पुष्पा-द रूल' येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. आणि अल्लू अर्जुन च्या वाढदिवशी आपल्या या चित्रपटाची टीझर ची झलक पाहायला मिळाली.

पण आता या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून घरी निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन कलाकार जखमी झाले आहेत.

Bus Carrying 'Pushpa 2' Artistes Meets With Accident In Nalgonda Dist Telangana

'पुष्पा-2' चित्रपटाचे चित्रीकरण संपवून तेलंगणाहूंंन हैदराबादला ही बस निघाली होती. या बसमध्ये चित्रपटातील कलाकारही होते. परंतु वाटेतच या बसचा अपघात झाला आहे. नलगोंडा हैदराबाद विजयवाड़ा येथील नलगोंडा रस्त्यावर 'पुष्पा 2'ची च्या कलाकारांची बस एका आरटीसी बसला धडकली. यामध्ये दोन कलाकार जखमी झाले आहेत.

या अपघतानंतर जखमी कलाकारांवर तातडीने उपचार करण्यासाठी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आंध्रप्रदेश येथील श्रीकाकुलम जिल्ह्यात हे चित्रीकरण सुरू होतं. शूटिंग संपल्यावर कलाकार हैदराबादच्या दिशेने निघाले होते. यावेळी बसवरचे नियंत्रण सुटून कलाकारांची बस आरटीसीच्या लोकल बसला धडकली. ज्यामुळे दोन कलाकार जखमी झाले. गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस धडकल्याचेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT