esakal
मनोरंजन

Munna Bhai-3 संदर्भात अर्शद वारसीचे मोठं वक्तव्य

खट्याळ अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता अर्शद वारसी मुन्ना भाई ३ मुळं चर्चेत आला आहे.

धनश्री ओतारी

‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘जॉली एलएलबी’ आणि ‘गोलमाल’ या मालिकेतील चित्रपटांमध्ये आपल्या खट्याळ अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता अरशद वारसी सध्या कॉमेडीपासून वेगवेगळ्या पात्रांचे प्रयोग करत आहे. सध्या त्याने एक इंग्रजी वृत्त संस्थेला दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यावेळी त्याने मुन्ना भाई ३ बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

2003 चा 'मुन्ना भाई M.B.B.S' चित्रपट असो किंवा 2006 चा 'लगे रहो मुन्ना भाई'. या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले असून आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा आहे.

अशातच सर्किटची भूमिका साकारणारा अरशदने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्यावर संभ्रम अवस्था दाखवली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अरशदने मुन्नाभाई एमबीबीएसने माझ्या करिअरला नवा ट्रॅक दिला. त्याआधी तीन-चार वर्षे माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. मी नजरेआड गेलो होतो! अशी भावना व्यक्त केली.

त्याच्या या वक्तव्या नंतर मुन्ना भाई पार्ट ३ बद्दल त्याला विचारण्यात आलं. तेव्हा 'लगे रहो मुन्ना भाई'ची आम्ही 16 वर्षांपासून वाट पाहत आहोत. खरे सांगायचे तर, मला वाटत नाही भाग 3 प्रदर्शित होईल. पण माझी आशा आहे की, या तिसऱ्या पार्टचा शेवट आम्ही चांगल्या प्रकारं करु. आम्ही प्रेक्षकांचे खूप ऋणी आहोत, पण मुन्ना भाई या चित्रपटाला खुपच वेळ लागत आहे. अशी प्रतिक्रीया त्याने दिली.

संजय दत्तने केला होता खुलासा

रिपोर्टनुसार, संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी मुन्ना भाई पार्ट ३ चा विचार करत आहेत. आणि मलादेखील या चित्रपटाबद्दल आशा आहे.

त्याच्या या वक्तव्यानंतर मुन्ना भाई पार्ट ३ ची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याची स्क्रिप्टदेखील तयार झाली असल्याचे बोलले जात होते. मात्र, अरशदच्या या वक्तव्यामुळं चाहते देखील संभ्रमात पडलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT