Canadian singer Kris Wu gets 13 years jail for rapes in China sakal
मनोरंजन

Kris Wu: बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध पॉपस्टार 'क्रिस वू' याला 13 वर्षांचा तुरुंगवास; 17 वर्षीय तरुणीवर..

17 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी 'क्रिस वू'ला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नीलेश अडसूळ

Kris Wu gets jail: कॅनडियन पॉपस्टार 'क्रिस वू' याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला ही कठोर शिक्षा सुनावली. एका 17 वर्षीय तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

(Canadian singer Kris Wu gets 13 years jail for rapes in China)

एका 18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'क्रिस वू'ने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. वयाच्या 17 व्या वर्षी क्रिसने तिच्यावर बलात्कार केल्याचं तीने म्हंटलं होतं. या प्रकरणी न्यायालयाने क्रिसला दोषी ठरवले असून त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने क्रिसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

क्रिसवर आरोप करणाऱ्या मुलीचे नाव 'डू मीझू' असे आहे. दोन वर्षांपूर्वी ती क्रिसला भेटली होती. क्रिसच्या घरी ती एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली असून तिचं लैंगिक शोषण करण्यात आले, असा आरोप तिने केला आहे.  

क्रिसला गेल्या वर्षी डेट-रेपच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आणखी 24 मुलींनी पुढे येत क्रिस विरोधात साक्ष दिली होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याची तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असते. पण कधी-कधी जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षादेखील होऊ शकते. क्रिसला 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

क्रिसचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे. क्रिस लोकप्रिय गायक असल्याने अनेक मोठ-मोठ्या ब्रॅंड्ससोबत तो काम करत असतो. पण बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रॅंड्सनी क्रिससोबत काम करणे नाकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT