Canadian Singer Shubh Finally Breaks Silence On Over Map Post Outrage & Cancellation Of India Tour Esakal
मनोरंजन

Canadian Singer Shubh: "भारत माझाही देश तर पंजाब..",खलिस्तानी असल्याचा आरोप करत शो रद्द होताच कॅनडियन रॅपर शुभची प्रतिक्रिया चर्चेत!

Vaishali Patil

Canada-based singer Shubh breaks his silence over concert cancellation: पंजाबी-कॅनेडियन रॅपर शुभनीत सिंग जो शुभ या नावाने देखील ओळखला जातो. तो सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत असतांनाच शुभच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यात आणखीच वाढ झाली.

भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादाच्या दरम्यान शुभने केलेल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. याचा परिणाम त्याच्या शोवर देखील झाला. त्याचा 'स्टिल रोलिन' इंडिया टूर देखील रद्द करण्यात आला. शुभजीत हा खलिस्तानी समर्थक असल्याचा आरोप त्याच्यावर होत असतांना त्याचे मुंबई, चंदीगडसह भारतातील शो रद्द केले गेले. त्याच्या निषेध करत शुभचे पोस्टरही जाळण्यात आले होते.

आता अखेर शुभने गुरुवारी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतात शो रद्द झाल्यानंतर कॅनडास्थित शुभनीत सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली. यात तो लिहितो की, भारत माझाही देश आहे. माझाही जन्म इथेच झाला. ही माझ्या गुरू आणि पूर्वजांची भूमी आहे. पण अलीकडील काही घटनांमुळे माझ्या मेहनतीवर आणि प्रगतीवर त्याचा परिणाम झाला आहे. याप्रकरणी माझी निराशा आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी मला काही बोलायचं आहे.

माझा भारत दौरा रद्द झाल्याने मी खुप निराश झालो आहे. माझ्या स्वत:च्या देशात, माझ्याच लोकांसमोर शो करण्यासाठी मी खूपच उत्सुक होतो. आमची या शोची तयारी देखील जोरात सुरू होती. गेल्या दोन महिन्यांपासून मी या कॉन्सर्टसाठी मनापासून सराव करत होतो. मात्र नियतीच्या मनात काही वेगळचं होतं.

भारताला आपला देश म्हणून सांगताना शुभनीत सिंगने त्याच्या गुरुंच्या हौतात्म्याचा उल्लेख करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन दिली.

शुभनीत पुढे लिहितो, 'भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला. ही भूमी आहे माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची, ज्यांनी या भूमीच्या वैभवासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला आहे.

पंजाब माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. आज मी जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळे आहे. पंजाबी लोकांना देशभक्तीचा दाखला देण्याची गरज नाही. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक पंजाबीला देशद्रोही असं लेबल लावणं टाळावं .

काही दिवसांपुर्वी रॅपरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर भारताचा विकृत नकाशा शेअर केला होता, ज्याला त्याने 'पंजाबसाठी प्रार्थना' असं कॅप्शन दिले होते. या घटनेनंतर विराट कोहलीने शुभनीतला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. शुभवर खुप टीकाही झाली.आता त्याची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या पोस्टला कमेंट करत आहेत.तर त्याचे चाहते त्याला पाठिंबा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT