Captain Miller Trailer: Esakal
मनोरंजन

Captain Miller Trailer: कधी राक्षसाला पाहिलंय? मीच तो! धनुषच्या कॅप्टन मिलरचा भयंकर ट्रेलर एकदा बघाच

कॅप्टन मिलरचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात धनुष अॅक्शन अवतारात दिसत आहे.

Vaishali Patil

Captain Miller Trailer: साऊथचा सुपरस्टार धनुष हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी कॅप्टन मिलर या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमाची बरेच दिवस चर्चा होती तर आता धनुषचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते.

आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. शनिवारी कॅप्टन मिलरचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात धनुष अॅक्शन अवतारात दिसत आहे. या चित्रपटातील धनुषच्या लूकची अन् अॅक्शनची सोशल मिडियावर तुफान चर्चा सुरु झाली आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की तो एका डाकूची भुमिका साकारत आहे. तो आपल्या गावाचं आणि तेथील खाणींचे ब्रिटिशांकडून संरक्षण करतोय आणि ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढा देत आहे. तर ट्रेलरच्या शेवटी दिसतंय की तो ब्रिटीश सैन्यात काम करणारा सैनिक होता.

त्यांची ओळख कॅप्टन मिलर होती. या चित्रपटात पुन्हा एकदा टॉलिवूडची अॅक्शन आणि थ्रिलर स्टोरी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

2 मिनिटे 54 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये बंदुकी, तलवारबाजी, गोळीबार आणि बॉम्बस्फोट सर्वच पाहायला मिळते.

धनुष स्टारर या चित्रपटात प्रियंका मोहन, शिव राजकुमार, सुदीप किशन, विनोद किशन, नस्सर आणि एडवर्ड सोनेनब्लिक यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. 2 मिनिटे 54 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये संपूर्ण अॅक्शन पाहता येईल. यात अनेक बंदुका, तलवारबाजी, गोळीबार आणि बॉम्बफेक दाखवण्यात आली आहे.

12 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कॅप्टन मिलर हा सिनेमा अरुण माथेश्वरन यांनी लिहिला आहे. त्यांनीच याचे दिग्दर्शनही केले आहे. कॅप्टन मिलर हा सिनेमा बॉलिवूड चित्रपट मेरी ख्रिसमससोबत स्पर्धा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT