captaincy task rakhi sawant this week captain Bigg Boss Marathi 4  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: कोण आहे राखीच्या मर्जीत? ज्याला मिळणार कॅप्टनपदाचा मान?

घरात पार पडणार कॅप्टन पदाच्या उमेदवाराचे अनोखे नियुक्ती कार्य!

नीलेश अडसूळ

bigg boss marathi S 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आज कॅप्टनसी टास्क होणार आहे. हा टास्क अत्यंत गमतीशीर आणि रंगतदार असणार आहे. कारण प्रथमच असा भन्नाट टास्क बिग बॉसने दिला आहे. कारण कॅप्टनसी कार्य म्हणजे डोक्यावर आठ्या, राडा असे वातावरण असते. पण यंदा मात्र अत्यंत आनंदात ही कार्य पार पडणार आहे. कारण या कार्यात प्रत्येकाला डान्स करायचा आहे. आणि ज्याचे सादरीकरण चार बॉसना म्हणजे राखी, मीरा, आरोह, विशाल यांना आवडेल तो कॅप्टन होणार आहे.

कॅप्टन होण्यासाठी स्पर्धक अत्यंत खडतर असे टास्क खेळण्यासाठीही तयार असतात. अगदी जीवाची पर्वा न करता ते भिडत असतात. कारण दिवसेंदिवस खेळ अधिक कठीण होत असल्याने प्रत्येकालाच कॅप्टन होऊन पुढच्या आठवड्यासाठी सेफ व्हायचं आहे. पण यंदा कॅप्टन कोण होणार ही बिग बॉस नाही तर वाइल्ड कार्ड एंट्रीने आलेले चार बॉस ठरवणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात आज धुमधडाक्यात पार पडणार आहे कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती. याचसोबत बघायला मिळणार आहे सदस्यांचे एकसे बडकर एक डान्स. 'BB Birthday Bash' म्हणजेच बिग बॉस यांच्या बर्थडे पार्टी मध्ये चॅलेंजर्सना महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांना घराचा कॅप्टन निवडायचा आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल यावर घरातील पुढची गणितं ठरणार आहे.

आपला डान्स कसा उत्तम होईल याच्या प्रयत्नात सगळे स्पर्धक आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून दिसून आले किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी सामे या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला आणि त्यावर राखीनी त्यांची प्रशंसा देखील केली. तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम याने देखील परफॉर्मन्स सादर केला. सगळ्यांनीच तगडे सादरीकरण केल्याने नेमकी कॅप्टन पदाची उमेदवारी कुणाच्या पदरात पडणार हे आज कळेलच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT