Cardi B Video Esakal
मनोरंजन

Cardi B Video: कार्डीवर पाणी उडवलं, तिनं डायरेक्ट माईकच फेकून हाणला

अमेरिकन गायिका कार्डी बी हिच्या कॉन्सर्टमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एकाने लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान तिच्यावर ड्रिंक फेकले तर भडकलेल्या कार्डीनंही माईक गर्दीत फेकून मारला.

Vaishali Patil

Cardi B Video: अमेरिकन रॅपर कार्डी बी ही तिच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यामुळे चर्चेत असते. तिची गाणी आणि लाईव्ह कॉन्सर्ट हे खुप लोकप्रिय असतात. तिचे चाहते त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.

तिच्या शोला केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात चाहत्यांची खुप गर्दी असते. मात्र सध्या कार्डी बी ही सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ. तिच्या लाईव्ह शो दरम्यान एकाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे.

यावेळी संतापलेल्या कार्डीनंही त्याला हातातला माईक मारुन फेकला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वत: कार्डीनं देखील हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एका चाहत्याने कॉन्सर्ट दरम्यान तिच्यावर ड्रिंक फेकलं होतं. कार्डीला चाहत्याचं हे वागणं मुळीच आवडलं नाही आणि तिनेही लगेचच रागात त्याला माइक मारत बदला घेतला.

मात्र असं काही घडल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही असं बऱ्याच कालाकारांसोबत घडलं आहे. याच महिन्यात सिंगर हॅरी स्टाइल्ससोबतही असं घडलं त्याला फुलांचा गुच्छ एकानं मारुन फेकला होता. त्याचबरोबर बेबे रेक्सा, ड्रेक, केल्सी बॅलेरीनी, स्टीव्ह लेसी, किड कुडी आणि पिंक आणि भारतात अरिजित सिंग आणि एमसी स्टॅन, सोनू निगम यांच्यासोबतही असं झालं आहे.

कार्डी-बी ही जगातील सर्वात लोकप्रिय रॅपर आणि गायकांपैकी एक आहे. ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते. 2015 मध्ये, कार्डी बी ने VH1 रिअॅलिटी टेलिव्हिजन शो लव्ह अँड हिप हॉप: न्यूयॉर्कच्या सहाव्या सीझनमध्ये पदार्पण केले. तिची फॅन फॉलोविंगही खुप आहे. तिला इंस्टाग्रावर 168 मिलियन फॉलोवर्स आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमी कनेंट राहते. वेळोवेळी पोस्ट शेयर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT