Carl Weathers Dies Marathi News sakal
मनोरंजन

Carl Weathers: प्रसिद्ध अभिनेता 'कार्ल वेदर्स' यांचे निधन, रॉकी मध्ये साकारली होती महत्वाची भूमिका

रॉकी आणि प्रीडेटर सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या हॉलीवूडचे कार्ल वेदर्स (Carl Weathers Death) यांचे निधन...!

सकाळ ऑनलाईन टीम

Carl Weathers Hollywood Actor passed away : रॉकी आणि प्रीडेटर सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या हॉलीवूडचे कार्ल वेदर्स (Carl Weathers Death) यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मॅनेरजनं त्यांचे निधन झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

राहत्या घरात कार्ल वेदर्स यांचे निधन झाले असून अद्याप त्यांच्या निधनाचे कारण समोर आलेले नाही. सिल्वेस्टार स्टॅलोनच्या रॉकी आणि प्रीडेटर (Rocky And Predator Movie) सारख्या चित्रपटांमध्ये कार्लनं केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं हॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.

कार्ल यांनी चित्रपट आणि वेगवेगळ्या टीव्ही शो मध्ये त्यांनी काम केले होते. आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयाच्या वेगळ्या शैलीमुळे ते नेहमीच कौतुकाचा विषय राहिले. याविषयी जागरणनं वृत्त दिले आहे. केवळ कला नव्हे तर क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी मोठे योगदान दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या निधनानंतर हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

कार्ल यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कार्ल हे आमच्यासाठी एका मोठ्या मार्गदर्शकासारखे होते. ते आमचे चांगले मित्र, भाऊ, वडील यांच्या भूमिकेत नेहमीच आदर्शव्रत राहिले. रॉकी या चित्रपटात काम करण्यापूर्वी कार्ल हे एक फुटबॉलपटू होते. त्यांना बॉक्सिंगचा कोणताही अनुभव नव्हता. त्यांनी रॉकी मध्ये अपोलो क्रीडची भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.

त्यानंतर त्यांनी ऑस्कर विजेत्या रॉकीच्या पुढील तीनही चित्रपटांमध्ये काम केले. त्याची चाहत्यांकडून वाहवा झाली. कार्ल यांनी नेहमीच प्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अलीला आपला आदर्श मानले. त्याचा उल्लेख त्यांनी अनेक मुलाखतींमधून केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT