mohit raina 
मनोरंजन

'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल

'सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच मोहितचाही मृत्यू शकतो', असा अभिनेत्रीने केला दावा

अनिश पाटील, प्रतिनिधी

'देवों के देव महादेव' devon ke dev mahadev फेम अभिनेता मोहित रैना Mohit Raina याने चार जणांविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मोहित रैनाबद्दल एक धक्कादायक दावा करण्यात आला होता. मोहितची कथित स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्मा Sara Sharma हिने सोशल मीडियावर 'सेव्ह मोहित' ही मोहीम चालवली होती. मोहितच्या जिवाला धोका आहे, असं तिचं म्हणणं होतं. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचाही मृत्यू होऊ शकतो, असं ती म्हणाली होती. मात्र नंतर मोहितचे कुटुंबीय आणि स्वत: मोहितने समोर येऊन मी अगदी फिट आणि फाइन असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली होती. (case against four after complaint registered by devon ke dev mahadev fame actor mohit raina)

त्यानुसार बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोरेगाव पोलिसांनी मोहितचा जबाब नोंदवून सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी यांच्याकडून ञास दिल्याचे रैना यांनी तक्रारीत म्हटले आहे. रैना यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

मोहितने 2005 पासून अभिनयाला सुरूवात केली. पण 'देवों के देव महादेव' या मालिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर त्याची सम्राट अशोकमधील भूमिकाही प्रेक्षकांनी उचलून धरली. 'उरी' चित्रपटातील त्याची छोटी पण महत्त्वाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून घेली होती. त्यानंतर 'भौकाल'मध्ये त्याने अभिनेत्री दिया मिर्झासोबत काम केले होते. सारा शर्मा ही देखील अभिनय क्षेत्रात असून तेलुगू चित्रपटसृष्टीत ती काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT