movie set 
मनोरंजन

चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनधिकृत सेट उभारणाऱ्या इव्हेंट मॅनेजरवर गुन्हा दाखल

विजय गायकवाड

मेडे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोणतीही परवानगी न घेता सेट उभारल्याप्रकरणी इव्हेंट मॅनेजरसह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या सेटवर लोकांची गर्दी करून कोरोनाच्या नियमांचीही पायमल्ली करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्या १५ जणांपैकी सात जणांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात भादवी कलम १८८, २६९ सह साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील खंड २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश जैस्वाल असं संबंधित इव्हेंट मॅनेजरचं नाव असून त्यांच्या देखरेखीखाली मेडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट उभारण्याचं काम वसईतील सनसिटीच्या मोकळ्या मैदानावर सुरू होतं. शूटिंगसाठी लागणाऱ्या परवानग्या न घेताच सेट उभारला गेला आणि त्यासाठी कामगारांची गर्दी करण्यात आली. 

माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष गीते यांनी गस्तीवर असताना याची चौकशी केली असता इव्हेंट मॅनेजरकडे संबधित परवानग्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी स्वता: फिर्याद देऊन इव्हेंट मॅनेजर दिनेश जैस्वालसह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल होऊनही पुन्हा शनिारी शूटिंगचं काम सुरू करण्यात आलं. तेव्हा माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन शूटिंग बंद पाडली. 

राज्यात गेल्या २४ तासांत ४७,८२७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या ही २९ लाखांवर गेली असून आतापर्यंत ५५,३७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील, पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने लॉकडाऊन करावी लागेल, असा इशार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. 

संपादन- स्वाती वेमूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon News : वनविभागाच्या अडथळ्यांमुळे रखडलेले आंबेगाव पूर्व भागातील रस्ते; जुन्नर येथे शिष्टमंडळाची निर्णायक बैठक; तोडग्याचे आश्वासन!

पाहायला मिळणार अस्सल अदाकारी! हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Mumbai News: नववर्ष २०२६ पूर्वी मुंबईत बीएमसीचा फायर अलर्ट! कडक निर्बंध लागू; नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय? वाचा...

Hidden Camera in Hotel: हॉटेल रुममध्ये असलेले छुपे कॅमेरे कसे ओळखायचे? ...नाहीतर तुमच्या खासगी क्षणांचा येईल सिनेमा

ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे.... ‘केस नं. ७३’ मध्ये उलगडणार मुखवट्यामागील रहस्य; दिसणार हे कलाकार

SCROLL FOR NEXT