Case filed against Kapil Sharma for breach of North America tour contract
Case filed against Kapil Sharma for breach of North America tour contract sakal
मनोरंजन

कपिल शर्मा अडकला कायद्याच्या कचाट्यात, फसवणुकीचा आरोप..

नीलेश अडसूळ

Kapil Sharma : दमदार टायमिंग आणि खुमासदार विनोद करून आपल्याला खळखळून हसवणारा विनोदवीर म्हणजे कपिल शर्मा. 'कपिल शर्मा कॉमेडी शो' मधून त्याने आपले भरपूर मनोरंजन केले. मध्यंतरी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे तो वादातही सापडला होता. पण आता मात्र त्याच्या पुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्याच्या एका चुकीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. (Case filed against Kapil Sharma for breach of North America tour contract)

कपिल शर्मा सध्या आपल्या टीमसोबत कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. कॅनडा टूर सुरू असतानाच कपिल शर्मावर ही वेळ आली आहे. त्याच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली असून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. कपिल शर्माने पैसे घेऊनही कॉन्ट्रेक्ट पूर्ण न केल्याचा हा आरोप आहे. हे प्रकरण 2015 मधील असून याबाबत आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Case File Against Kapil Sharma)

साई यूएसए इंक (Sai USA Inc) यांनी कपिल शर्माच्या विराधात तक्रार दाखल केली आहे. 2015 मध्ये कपिल शर्माने उत्तर अमेरिकामध्ये काही शोसाठी एक कॉन्ट्रेक्ट साइन केले होते. त्यासाठी त्याने पैसेही घेतले पण काँन्ट्रक्ट पूर्ण केले नाही. याविषयी अमेरिकेतील प्रसिद्ध शो प्रमोटर अमित जेटली म्हणाले, 'कपिल शर्माने सहा शो करण्याचे कॉन्ट्रेक्ट केले होते. त्यासाठीची रक्कमही त्याला देण्यात आली होती. पण कपिल शर्माने एकही शो केला नाही. कपिल शर्माने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप पैसे परत केले नाहीत अन् शो ही केले नाहीत. कपिल शर्माकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही कपिल शर्मासोबत अनेकदा बोलण्याचा प्रयत्नही केला पण अखेर आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली' सध्या हे प्रकरण न्यूयॉर्कमधील न्यायालयात आहे. निश्चितच आम्हाला न्याय मिळेल, असेही जेटली म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT