मनोरंजन

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीचा विनयभंग; आरोपी अटकेत

फेसबुक अकाऊंटवर स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर अशी लिहिली होती.

सकाळ डिजिटल टीम

बंगाली चित्रपटातील अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग करणाऱ्या एका कास्टिंग डायरेक्टरला मालाड (Malad) पोलिसांनी अटक केली. नवोदित अभिनेत्रींना हिंदी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून त्यांना मुंबईला बोलावून ऑडिशनच्या नावाखाली आरोपी त्यांचा विनयभंग करत असल्याचं तपासात समोर आलं. ओमप्रकाश तिवारी असं आरोपीचं नाव असून तो 24 वर्षांचा आहे. काही महिन्यांपूर्वी तो चित्रपटांशी संबंधित एका नामांकित कंपनीत काम करत होता. त्यावेळी त्याने फेसबुक अकाऊंटवर स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर अशी लिहिली होती. नवोदित अभिनेत्रींना मोठमोठी आश्वासनं देऊन संबंधित आरोपी त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. अशाच प्रकारे तो बंगाली चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या संपर्कात आला.

डिसेंबर 2021 मध्ये या बंगाली अभिनेत्रीला तिवारीने ऑडिशनच्या नावाखाली मुंबईला बोलावलं. वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीला तोकडे कपडे घालून फोटोशूट करण्यास सांगितलं. हे करत असताना तिवारी अभिनेत्रीला वारंवार चुकीचा स्पर्श करत होता. यावर महिलेने आक्षेप घेतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर अभिनेत्रीने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीविरोधात मालाड पोलीस ठाण्यात 345 (अ),(ब),67(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली. आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT