sameer wankhede, aaryan khan, sameer wankhede case update, aaryan khan drug case
sameer wankhede, aaryan khan, sameer wankhede case update, aaryan khan drug case SAKAL
मनोरंजन

Sameer Wankhede: बुडत्याचा पाय खोलात ! ५ तास CBI चौकशी, वानखेडेंच्या निलंबनाची शक्यता

Devendra Jadhav

Sameer Wankhede Case Update: आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणाची सध्या बरीच चर्चा आहे. आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ करोडची डील केल्या प्रकरणात सीबीआयनं समीर वानखेडेची चौकशी सुरु केली आहे.

ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांच्या आधारावर एक गोष्ट तर लक्षात येतेय की समीर वानखेडेंनी अनेक खुलासे केले आहेत. आज CBI ने समीर वानखेडेंची ५ तास कसून चौकशी केलीय.

अखेर या चौकशीतून समीर वानखेडे यांचं निलंबन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय CBI पुन्हा एकदा समीर वानखेडेंना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

(CBI has interrogated for 5 hours. Finally, it is predicted that sameer wankhede will be suspended )

आर्यन खान केस प्रकरणात समीर वानखेडे यांचे वकील म्हणाले, हे सर्व आरोप खोटे आहेत, शाहरुखच्या चॅटमध्ये आमिषाचा उल्लेख नाही. सीबीआयला देखील विचारणा केली. त्यांचे वकील हजर होते. ही पूर्ण केस, जे आरोप झाले आहेत ते चुकीचे आहेत.

त्याला कुठलाही पुरावा नाही, एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्या अधिकारात काम केले आहे. वानखेडे यांनी चुकीचे निर्णय घेतले आहे असं त्यांनी म्हटलंय.

मात्र त्यात काही तथ्य नाही. चार महिन्यानंतर ती तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला काही अर्थ नाही. लाच घेणारा एक आहे तर देणारा पण कोणीतरी असेल ना ?

कोर्टासमोर हे सगळं सांगण्यात आले आहे. आता एनसीबीनं वेळ मागितला आहे. २२ पर्यत अटक केली जाणार नाही. याप्रकरणात एनसीबी काय तपास करणार हे पाहणं महत्वाचे आहे.

समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर आलेलं आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती.

या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता. आता समीर वानखेडे यांचं खरंच निलंबन होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT