anil deshmukh on sushant
anil deshmukh on sushant 
मनोरंजन

सुशांत प्रकरणाच्या तपासाबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांंचं मोठं वक्तव्य, वाचा काय म्हणाले..

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पहिल्या दिवसापासून त्याच्या कुटुंबातील काही सदस्य, काही बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्याचे चाहते ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत आहेत. इतकंच नाही तर सोशल मिडियावर त्याच्यासाठी अनेक मोहिम देखील राबवत आहेत. चाहते आणि काही सेलिब्रिटींसोबंतच नुकतंच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनेही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणात सीबीआयने लक्ष घालावं अशी विनंती केली होती. मात्र आता या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय की, 'मुंबई पोलिस अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत म्हणूनंच सुशांतच्या केसमध्ये सीबीआय तपासाची काहीही गरज नाही.' देशमुख यांनी सांगितलं की, त्यांना सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपासाबाबत सोशल मिडियावर सुरु असलेल्या मोहिमेची पूर्ण कल्पना आहे. मात्र मुंबई पोलीस पूर्ण सक्षम आहेत आणि ते व्यावसायिक दुश्मनी सोबत सगळ्याचं दृष्टीने तपास करत आहेत.

देशमुख यांनी हे देखील स्पष्ट केलं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा कट आहे याचा खुलासा झालेला नाही. आणि तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण डिटेल्स समोर आणले जातील. 

मुंबई पोलिसांनी गुरुवारी हिंदूजा हॉस्पिटलचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ यांची देखील चौकशी केली आहे जे सुशांतवर उपचार करत होते. सुशांत नैराश्याने ग्रासला होता असं म्हटलं जात होतं. मानसोपचार तज्ज्ञ यांच्याव्यतिरिक्त सुशांतचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि बॉलीवूडशी संबधित काही लोक अशा जवळपास ३६ लोकांचा जबाब आत्तापर्यंत या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे.   

cbi probe is not needed in sushant case says maharashtra home minister anil deshmukh  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींनी गोड बोलून ठाकरेसेनेसाठी खिडकी उघडली? उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याबद्दल दिलं उत्तर

Mumbai Local Train : सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

Prajwal Revanna Scandal: 'माझ्या आईवर बलात्कार केला अन् व्हिडिओ कॉलवर मला...'; प्रज्वल रेवन्ना स्कँडलमधील पीडितेने सांगितली आपबीती

RCB Qualification Scenario : RCB प्ले ऑफमध्ये जाणार? 18 तारखेला, 18 रन्स, 18 ओव्हर्स अन् चेन्नईचा खल्लास खेळ; समजून घ्या गणित

SCROLL FOR NEXT