celebrity celebrates International yoga day  
मनोरंजन

सेलिब्रिटींची 'योग'साधना

सकाळवृत्तसेवा

आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सोशल मिडीयावर सगळीकडे लोक आपले योग करतानाचे फोटो अपलोड करत आहेत. योग प्रसार आणि प्रचारासाठी बरेचजण प्रयत्न करत आहेत. आज चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींमध्ये योग दिवसाचे महत्त्व दिसले. काही सेलिब्रिटीज् नेहमी व्यायामाचे महत्त्व नेहमी आपल्या चाहत्यांना समजावत असतात. या योग दिवसानिमित्तही सेलिब्रिटींनी योगसाधनेचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. 

गरोदरपणात योगासन आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे असं टेनिसपटू सानिया मिर्झानं सांगत ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. 
 


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विश्वशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग दिवसानिमित्त भारताचं अमूल्य योगदान आहे असं सांगत ट्विट केलं आहे. 
 


स्लिमट्रिम पण नेहमी फिटनेसच्या बाबतीत अग्रेसर असणारी अभिनेत्री मलाइका अरोराने इन्स्टाग्रामवर दिवा योग या नव्या उपक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 
 


अभिनेत्री सोहा अली खान हिनेही ती योग का करते याविषयी सांगत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
 


शिल्पा शेट्टी कुंद्रा हीचे योग बद्दलचे प्रेम सर्वपरिचित आहेच. प्रणायाम म्हणजे जीवन असं सांगत तिनं इन्स्टाग्रामवर योग व्हिडीओ शेअर केला आहे. 
 


अभिनेता भुषण प्रधानने योगातील कठीण आसन करतानाचा फोटो शेअर केला आहे. 
 


अभिनेता शक्ती अरोरा याने बुध्दीला आव्हान देण्याची गरज सांगत इन्स्टाग्रामवर योगसाधनेचा फोटो शेअर केला आहे.  
 




आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT