This Celebrity supports Tanushree Dutta On social media
This Celebrity supports Tanushree Dutta On social media 
मनोरंजन

'या' सेलिब्रिटींचा तनुश्रीला पहिल्यांदा पाठिंबा ! ; बघा व्हिडीओ

सकाळवृत्तसेवा

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले आहे,' असा आरोप केला आहे. या मुद्द्याची चर्चा जास्तच रंगली आहे. सिनेसृष्टीत काहींनी या मुद्द्यावर विचारले असता मौन पाळले तर काहींनी तनुश्रीला पाठिंबा दर्शविला आहे. 

तनुश्रीने एका मुलाखतीत मी टू (#metoo) मोहिमेबद्दल बोलताना नाना यांनी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उल्लेख केला. त्यानंतर सोशल मिडीयावर काही कलाकारांनी #IBelieveYouTanushreeDutta हा ट्रेंड सुरु केला. या ट्रेंड अंतर्गत या कलाकारांनी तनुश्रीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. 

‘तनुश्रीवर टीका करण्यापूर्वी किंवा तिला अयोग्य ठरविण्यापूर्वी नीट विचार करा. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे’, असे ट्विंकल खन्ना यांनी केले आहे. तर फरहान अख्तरने देखील ट्विट करत म्हटले की, 'तनुश्रीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे केल्यापेक्षा तिच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे.' फरहानच्या ट्विटला रिट्विट करत प्रियंकानेही तनुश्रीला पाठिंबा दर्शविला.

 



काय आहे प्रकरण ?
2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाचे शुटींग सुरु होते. तनुश्रीच्या सांगण्याप्रमाणे, 'या सिनेमासाठी ती एक गाणं शूट करत होती. तेव्हा नाना यांनी तिला आपल्या बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर सारुन डान्स कसा करावा हे ते दाखवत होते.' यावरुन 10 वर्षांनी तनुश्रीने आवाज उठविला आहे. या प्रकरणावर तिने आता म्हटल्याप्रमाणे, 'जर एखादी महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविते, तेव्हा आपल्या समाजात तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला जातो. तिच्यावर विश्वास ठेवायला अजून समाज शिकलेला नाही. नाना यांना शिक्षा होईल किंवा नाही हा नंतरचा मुद्दा आहे. पण नाना सारख्या लोकांसोबत काम करणे सोडले पाहिजे. माझ्या सारख्या महिलांच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्याऐवजी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर लोकांची साथ मिळणे गरजेचे आहे.'





संबंधित बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT