Pushkar-Jog 
मनोरंजन

सेलिब्रिटी वीकएण्ड : ‘संडे’ आमच्यासाठी ‘फन डे’

पुष्कर जोग, अभिनेता

प्रत्येकासाठी वीकएण्ड ही गरजेची गोष्ट आहे, कारण आपण आठवडाभर काम करत असतो. त्यातून विश्रांतीची गरज असते. त्यामुळं काहीही झालं तरी मी रविवारी हमखास सुटी घेतो. अपवादात्मकस्थिती असल्यासच शूटसाठी जातो. रविवारचा दिवस कुटुंबीयांसाठी राखीव असतो. या दिवशी मी माझ्या मुलीसह पत्नी व शक्‍य असल्यास आईलाही फिरायला घेऊन जातो. मुलीला प्लेझोनमध्ये खेळायला खूप आवडतं. तिथं तिच्या चेहऱ्यावर येणारं हास्य आम्हाला समाधान देऊन जातं. त्याचबरोबर वरळीतील सी-फेस किंवा मरीन ड्राइव्हवरही आम्ही भटकंती करतो. समुद्रकिनाऱ्यावर जायला व तिथं आरामशीर फिरायला खूप मजा येते. 

आम्ही निसर्गाच्या सान्निध्यातही जातो. त्यामध्ये महाबळेश्‍वर व लोणावळ्याचा समावेश असतो. मात्र, तिथं अनेक चाहते भेटतात. त्यामुळं त्यांनाही वेळ द्यावा लागतो. परिणामी, कुटुंबीयांना फारसा वेळ देता येत नाही आणि प्रायव्हर्सीही राहत नाही. मी आणि पत्नीनं एक नियम केला आहे, तो म्हणजे तीन महिन्यांतून एकदा परराज्यात वा परदेशात जायचं. त्यामुळं चौथ्या महिन्याचा पहिला आठवडा आला की, आमचा प्लॅन ठरलेलाच असतो. अनेकदा आम्ही केरळ वा गोव्याला जातो. त्याचबरोबर दुबईलाही जातो. लंडन तर माझं दुसरं घरच आहे! तिथंही आम्ही कायमच जातो. 

कुटुंबीयांसमवेत वेळ घालवला, की मन प्रसन्न आणि आनंदी राहतं. त्यामुळं रिलॅक्‍सही वाटतं. आपल्यावर कामाचा नकळतपणे जो ताण येतो, तो दूर होतो. बाहेर गेल्यामुळं तेथील अनेक गोष्टींची माहिती होते. वेगवेगळ्या भागाची परंपरा, संस्कृती समजते.

त्याचप्रमाणं तेथील विविध पदार्थांचा आस्वादही घेता येतो. हवामानबदलाचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. त्यातून ऊर्जा आणि उत्साह मिळतो. त्यामुळं आम्ही आईलाही बरोबर घेऊन जातो. गप्पागोष्टींमध्ये दंग होतो. धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून एकमेकांना वेळ दिल्याचं समाधान खूप काही देऊन जाते. आईही नातीबरोबर खेळते. त्यामुळे तिलाही मजा येते. 

माझी पत्नी एअर इंडियामध्ये होती. त्यामुळं आम्ही सर्वच ठिकाणच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. तरीही बाहेर गेलो की, त्या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध पदार्थांची चव चाखतो. चायनीज, कॉन्टिनेंटल फूड खातो. दुबईमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रीय माणसे भेटतात. त्यांच्याकडं जाऊन अळूची भाजी, शिकरण, पुरणपोळीचा आस्वाद घेतो. खरेतर या गोष्टी आपल्याला आनंद देत राहतात. त्यातून समाधानही मिळते. त्यामुळं प्रत्येकानं आठवड्यातून एकदातरी घर सोडून निसर्गाच्या सानिध्यात जावं. कुठेतरी ट्रिप काढावी. ट्रेकिंग करावे वा आपल्याला आवडणारी गोष्ट करावी. त्यातून आनंद मिळतोच.... 
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT