celerity chotu dada tractor Wala chotu comedy video is on number 2 in YouTube top trending videos 
मनोरंजन

छोटू दादा यु ट्युबरच्या यादीत दुस-या नंबरवर; ट्रॅक्टरच्या व्हिडिओला 21 कोटी हिट्स

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणा-या छोटू दादा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमुळे तो प्रेक्षकांच्या आवडीचा झाला आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला मिळणारे लाईक्स आणि कमेंटस यांची संख्या लाखांच्या घरात आहे. सध्या यु ट्युबनं 2020 चे टॉप ट्रेडिंग व्हिडिओजची यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमध्ये अशा व्हिडिओजचा समावेश करण्यात आला आहे ज्यांनी 2020 मध्ये लोकप्रियता मिळवली होती.

यासगळ्यात छोटू दादाचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या युट्युबवर प्रसिध्द झालेल्या व्हिडिओमुळे छोटू दादाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. छोटू दादाचा कॉमेडी व्हिडिओ ज्याचे नाव छोटू दादा ट्रॅक्टरवाला युट्युबच्या टॉप ट्रेडिंग व्हिडिओजच्या दुस-या क्रमांकावर आहे.

छोटू दादाच्या ट्रॅक्टरच्या व्हिडिओला आतापर्यत 21 कोटी 47 लाख वेळा पाहिले गेले आहे. त्यामुळे तो व्हिडिओ दुस-या नंबरवर आहे. छोटू दादा हा कॉमेडी कलाकार म्हणून प्रसिध्द आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. पहिल्या क्रमांकावर कैरी मिनातीचा व्हिडिओ आला आहे.

'यूट्यूब वर्सेज टिकटॉकः द ऐंड' असे त्याचे नाव आहे. तर दहाव्या स्थानाचा विचार केला तर त्याजागेवर कॉमेडी टीव्ही सीरियल तारक मेहता का उल्टा चष्मा असे आहे. त्यात टप्पू हा सोनूला प्रपोझ करतो असे त्या व्हिड़िओमध्ये दाखवण्यात आले होते. त्या व्हिडिओला आतापर्यत पाच कोटी लोकांनी पाहिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

SCROLL FOR NEXT