Censor Board New CEO Smita Vats Sharma Big action against Censor Board's former CEO Ravindra Bhatkar  SAKAL
मनोरंजन

Censor Board New CEO: रविंद्र भाटकरांवरील कारवाईनंतर सेन्सॉर बोर्डाचे सीईओ बदलले; स्मिता वत्स यांच्याकडे जबाबदारी

लाचखोरी प्रकरणात रविंद्र भाटकरांची हकालपट्टी झाली असुन सीईओपदी नवी नियुक्ती करण्यात आलीय

Devendra Jadhav

Censor Board New CEO Smita Vats Sharma News: गेल्या काही दिवसांपासुन सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजतोय. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रवींद्र भाटकर यांच्यावर अभिनेता विशालने लाचखोरीचा गंभीर आरोप लावला होता.

आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. स्मिता वत्स शर्मा यांची सेन्सॉर बोर्डाच्या नवीन सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त जाणून घ्या.

(Censor Board New CEO Smita Vats Sharma Big action against Censor Board's former CEO Ravindra Bhatkar)

माजी सीईओ रविंद्र भाटकरांवर झाली ही कारवाई

स्मिता वत्स शर्मा या सेन्सॉर बोर्डाच्या नवीन सीईओ झाल्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेने जारी करण्यात आला आहे. कालपर्यंत सीईओ असलेले रवींद्र भाटकर आता या पदावर नाहीत. त्यांना कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले.

भाटकर यांची पुन्हा रेल्वे मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र यांच्या बदलीचे कारण अद्याप समजलेले नाही. याशिवाय रविंद्र यांनी राजीनामा दिला की त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तामिळ अभिनेता विशालने केलेले गंभीर आरोप

काही दिवसांपुर्वी सेन्सॉर बोर्डावर लाचखोरीचा आरोप झाला होता. तमिळ अभिनेता विशालने हा आरोप केला होता. चित्रपट पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना 6.5 लाख रुपये द्यावे लागले असं त्याने आरोपात सांगितलं होतं.

इतकंच नाही तर हे आरोप करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर, या प्रकरणी गुन्हा नोंदवून CBI ने CBFC चे काही अधिकारी आणि इतर तिघांविरुद्ध तपास सुरू केला होता. आता रवींद्र भाटकर यांच्यावर झालेली कारवाई याच प्रकरणी असू शकते असा अंदाज लावला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT