Vidya Malvade 
मनोरंजन

लग्नाच्या तीन वर्षांनंतर विमान अपघातात झाला अभिनेत्रीच्या पतीचा मृत्यू

स्वाती वेमूल

२००७ मध्ये शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला 'चक दे इंडिया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक झालं. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवरही आपलं नाव कोरलं. या चित्रपटात महिलांच्या हॉकी टीममधील अभिनेत्री विद्या मालवडेनं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. विद्या शर्माची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विद्याने 'मिसमॅच्ड' या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. यामध्ये तिने जीनत करीम या महिलेची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये या ४१ वर्षीय महिलेच्या पतीचं निधन झालेलं असतं. खऱ्या आयुष्यातही विद्या अशाच घटनेला सामोरी गेली आहे. विद्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. 

लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीचं निधन
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी विद्याने एअरहॉस्टेस म्हणून काम केलं होतं. १९९७ मध्ये तिने पायलट कॅप्टन अरविंद सिंह बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या तीन वर्षांनंतर अरविंद यांचं एका विमान अपघातात निधन झालं. २००० मध्ये पाटणा इथं त्यांचं विमान एका इमारतीला धडकलं होतं. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. 

नऊ वर्षांनंतर थाटला दुसऱ्यांदा संसार
विद्याने पतीच्या निधनानंतर २००३ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. 'इंतेहा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने बेनाम, किडनॅप, तुम मिलो तो सही, आप के लिए हम, नो प्रॉब्लेम, दस तोला, स्ट्रायकर, १९२०: एव्हिल रिटर्न्स, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, यारा सिल्ली सिल्ली यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. २००९ मध्ये विद्याने संजय दायमाशी दुसरं लग्न केलं. संजयने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटासाठी पटकथालेखक व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 

योगसाधनेची आवड
विद्याला फिटनेस आणि योगसाधनेची खूप आवड असून सोशल मीडियावर ती अनेक व्हिडीओ पोस्ट करत असते. याशिवाय योग प्रशिक्षक म्हणूनही काम करते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar: आधी पावसानं झोडपलं, आता भूकंपानं हादरलं पालघर; कासा, धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केलचे धक्के

IND vs ZIM 2nd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

Live Updates Marathi : दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याण येथील फडके मैदानात विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन

CJP Protest : आंदोलकांचा चेहरा स्कॅन करणाऱ्या AI चा दिल्ली पोलिसांकडून वापर; गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह, कसं कामं करत हे तंत्रज्ञान?

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

SCROLL FOR NEXT