Kushal Badrike, Kushal Badrike news, Kushal Badrike family, Kushal Badrike wife SAKAL
मनोरंजन

Kushal Badrike: मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही.. बायको परदेशी गेल्यावर कुशलची पोस्ट चर्चेत

कुशलने सोशल मीडियावर बायकोला एअरपोर्ट वर निरोप देतानाचा फोटो पोस्ट केलाय.

Devendra Jadhav

Kushal Badrike News: अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर चर्चेत असतो. कुशलचा अभिनय आणि त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्ट कायम चर्चेत असतात.

कुशलची नवीन पोस्ट चर्चेत आलीय. कुशलची बायको आता काही दिवसांसाठी अमेरिकेला चालली आहे.

त्यानिमित्ताने कुशलने सोशल मीडियावर बायकोला एअरपोर्ट वर निरोप देतानाचा फोटो पोस्ट केलाय.

(chala hava yeu dya fame marathi actor kushal badrike emotional post after his wife going to america)

कुशल लिहितो.. यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार.. जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”. खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हां…..

कुशल पुढे लिहितो... हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील,

“मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल.. काय गंमत आहे बघ, कधी काळी,

“आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….

आणि मी………..मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)

कुशल शेवटी लिहिते.... तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार... आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा.

अशी पोस्ट करत कुशलने बायकोला निरोप दिलाय. कुशलची बायको सुनैना सुद्धा अभिनेत्री आणि डान्सर आहे.

कुशलची बायको सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या मुगल ए आजम नाटकात डान्सर म्हणून काम करतेय. या नाटकात मराठमोळी गायिका आणि अभिनेत्री प्रियंका बर्वे अनारकलीच्या भूमिकेत झळकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT