Tushar Deval and Gulki Joshi Instagram
मनोरंजन

'किमान सॉरी म्हणायला तरी..'; अभिनेत्रीमुळे 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार संतप्त

सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितला सर्व प्रकार

स्वाती वेमूल

'चला हवा येऊ द्या' Chala Hawa Yeu Dya या लोकप्रिय कार्यक्रमातील एका कलाकाराला अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संगीत दिग्दर्शक तुषार देवलने Tushar Deval सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री गुलकी जोशीने Gulki Joshi तिच्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये चुकून तुषारचा मोबाइल नंबर पोस्ट केला. त्यामुळे तुषारला दिवसभरात असंख्य कॉल्स येत आहेत. या नाहक त्रासानंतर अभिनेत्रीने तुषारची माफीदेखील मागितली नाही.

तुषार देवलची पोस्ट-

'नमस्कार, मी तुषार देवल.. गेले काही दिवस मला खूप unknown कॉल येत आहेत. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त झालो आहे. या सगळ्याचं कारण आहे एका हिंदी मालिकेतील अभिनेत्री (ख्याती जोशी) उर्फ गुलकी जोशी हिने तिच्या एका युट्यूब इंटरव्ह्यूमध्ये तिचं CINTAAचं कार्ड दाखवलं, ज्यात माझा मोबाइल नंबर दाखवला गेला आहे. त्यामुळे मला गुलकी जोशी समजून दिवसाला जवळपास १०० च्यावर कॉल्स येत आहेत. ही सर्व माहिती मी त्या अभिनेत्रीपर्यंत माझ्या एका मित्राच्या माध्यमातून पोहोचवली. त्यावर तिने त्या युट्यूब चॅनेलमधील व्हिडीओतील माझा नंबर ब्लरदेखील केला. पण तोपर्यंत तो व्हिडीओ सहा हजार लोकांनी पाहिला होता. त्यामुळे मला अजूनही कॉल्स येत आहेत. बरं या सगळ्या प्रकारानंतर मॅडमनी मला सॉरी म्हणायला तरी कॉल करायला पाहिजे होता. तो अद्याप आलेला नाही. तरी या प्रकरणातून मार्ग कसा काढता येईल,' अशी तक्रार तुषारने केली.

तुषारच्या या पोस्टवर काहींनी त्याला अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी त्याला त्याचा मोबाइल नंबर बदलण्यास सांगितलं. इतकंच नव्हे तर काहींनी अभिनेत्री गुलकी जोशीला या पोस्टच्या कमेंटमध्ये टॅग करत तिला माफी मागण्यास सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT