https://www.instagram.com/reel/CzjagcbtgCl/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== Esakal
मनोरंजन

Diwali 2023: चला हवा येऊ द्या फेम कलाकाराने केली गृहलक्ष्मीची पुजा, व्हिडीओचं सगळीकडून कौतुक

चला हवा येऊ द्या फेम तुषारने हा खास व्हिडीओ शेअर केलाय

Devendra Jadhav

Tushar Deval Video News: सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी केली आहे आहे. कुठे सुंदर रांगोळी काढून, कुठे फटाके फोडून, कुठे फराळ खाऊन प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीचा आनंद घेत आहे. काल सगळीकडे लक्ष्मीपूजन करण्यात आलं. अनेकांनी लक्ष्मीमातेची पूजा करून भरभराटीची प्रार्थना केली असणार.

अशातच एका मराठी कलाकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा मराठी कलाकार म्हणजे तुषार देवल. तुषारने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच्या बायकोची सुद्धा पूजा केलीय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे.

तुषारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत तुषारची बायको स्वाती सुद्धा दिसतेय. व्हिडिओत तुषार सुरुवातीला लक्ष्मीमातेची पूजा करतो. नंतर तो त्याच्या बायकोला ओवाळतो. स्वाती सुद्धा देवीच्या रूपात खुर्चीवर बसलेली दिसते. तुषार तिला ओवाळतो आणि तिच्या पाया पडून नमस्कार करतो.

तुषारचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. लक्ष्मीचं पूजन झाल्यावर गृहलक्ष्मीचं पूजन करणेही आवश्यक असं कॅप्शन देत तुषारने हा व्हिडिओ सर्वांसोबत शेयर केलाय. अनेकांनी तुषार आणि स्वातीच्या या व्हिडिओचं कौतुक केलंय. तुषार चला हवा येऊ द्या शो मध्ये संगीताची धुरा सांभाळतो. स्वाती सुद्धा अभिनेत्री असून ती शेवटी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत झळकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT