Bhau Kadam, Dr. Nilesh Sable Instagram
मनोरंजन

Video: भाऊ कदमचं असं काय चुकलं की निलेश साबळेनं त्याची थेट शाळाच घेतली

'चला हवा येऊ द्या' सेटवरील बॅकस्टेजच्या घडामोडींचा हा धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष केवळ महाराष्ट्रातीलच नाही जगातील कानाकोपऱ्यात विसावलेल्या मराठी रसिक जनांचं अविरतपणे मनोरंजन करीत आहे. याचं संपूर्ण श्रेय खरंतर 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या टीमचं. अनेकदा अशा कार्यक्रमात कलाकारांमधल्या कुरघोडींमुळे किती कलाकार येतात अन् जातात. पण 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची मात्र जी जुनी पहिली टीम दिसत आली आहे ती अद्यापपर्यंत बदलली गेली नाही.

म्हणजे शो चा सर्वेसर्वा डॉ.निलेश साबळे(Nilesh Sable),भाऊ कदम(Bhau Kadam),कुशल बद्रिके(Kushal Badrike),भारत गणेशपुरे,सागर कारंडे,श्रेया बुगडे(Shreya Bugde) या सहा जाणांचं टीम वर्क तर भन्नाटच म्हणावं लागेल. त्याव्यतिरिक्त काही नवीन कलाकार शो शी जोडले गेले खरे पण या सहा जणांची जादू मात्र कायम राहिली. अनेकदा हे कलाकारच 'चला हवा येऊ द्या' च्या यशा मागे हेच टीम वर्क म्हत्त्वाचं ठरतं असं वारंवार त्यांच्या मुलाखतीतून बोलताना आपण ऐकत असालच. पण आता नेमकं 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर असं काय घडलं की डॉ.निलेश साबळेनं भाऊ कदमची शाळाच घेतलीय. अर्थात कार्यक्रम विनोदी असल्याकारणानं नेहमीच इथं पडद्यामागेही धम्माल-मस्ती रंगवणारे किस्से घडतच असतात. त्यात म्हणे भाऊ कदमचं पाठांतर थोडं कच्च आहे, तो अनेकदा गोष्टी विसरतो पण आपल्या हजरजबाबीपणाने म्हणा किंवा आपल्या परफेक्ट विनोदी टायमिंगने म्हणा एखादा चांगला पंच चुकलेल्या ठिकाणी मारुन मस्त रंगत आणतो. पण मग असं असताना डॉ.निलेश साबळेनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत ते अख्ख्या सेटवर भाऊच्या नेमक्या कुठल्या चुकीचे पाढे वाचत सुटले आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर. (Bhau Kadam Comedy Video)

आजच्या 'चला हवा येऊ द्या' च्या भागात येणार आहे 'देवमाणूस २' ची टीम. तर त्या निमित्तानं 'चला हवा येऊ द्या' च्या टीममधील सर्वचजणांनी मालिकेतील प्रमुख पात्रासह इतर पात्रांची व्यक्तिरेखा साकारलेली आपण पाहणार आहोत. अर्थात नेहमीप्रमाणे धम्माल असणारच आहे. त्यावेळचीच बॅकस्टेज तयारी आणि रिहर्सलचा एक व्हिडीओ डॉ.निलेश साबळेनं पोस्ट केला आहे. त्यात सेटवर चक्क उंटही आले आहेत. त्यात भाऊ देवमाणूसच्या आत्ताच्या राजस्थानी पेहरावात दिसतोय,पण तो बनलाय 'भाऊमाणूस'. तेव्हा नेमकं डॉ.निलेश साबळेनं भाऊला कुठून आलायत विचारलं तर भाऊ बोलला,'हरयाणा'...तेव्हा मात्र त्यानंतर अख्ख्या सेटवर भाऊच्या या चुकीचे प्रत्येकाजवळ विनोदी ढंगात निलेशनं पाढे वाचले. आणि बिचाऱ्या भाऊकडून दोनदा-तीनदा वधवून घेतले. कुठून आलाय आपण?...म्हणा राजस्थान, ते हरयाणा नाही....आता हे वाचण्यापेक्षा 'चला हवा येऊ द्या' च्या स्टेजवरील बॅकस्टेजचा हा धम्माल व्हिडीओ इथे बातमीत जोडला आहे तो पाहण्यात खरी गंम्मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Latest Marathi News Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

Indigo Issues: मतभेद, अंतर्गत अस्थिरता अन्... देशातील सर्वात मोठी एअरलाइन संकटात! इंडिगोचा मालक कोण? समस्यांनी का वेढलं? वाचा...

Digital Banking : डिजिटल बँकिंगचे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू! तुमच्या ऑनलाइन बँकिंगमध्ये काय बदलणार?

SCROLL FOR NEXT