Chandrayaan-3 Movie Announced  Esakal
मनोरंजन

Chandrayaan-3 Movie Announced: चांद्रयान-३ वर चित्रपट येणार! मिशन मंगलच्या दिग्दर्शकाने केली घोषणा

Vaishali Patil

Chandrayaan-3 Movie Announced इस्त्रोची चांद्रयान 3 मोहीम ही यशस्वी झाली. भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश झाला आहे. आता लवकरच इस्रोचे हे यश मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्ती हे तयार आहेत.

जगन शक्ती हे हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी जगन सज्ज आहेत. वृत्तानुसार शक्ती यांनी मिशन मंगलच्या टीमसोबत हा चित्रपट बनवणार असल्याची पुष्टी केली आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना जगन शक्ती यांनी सांगितले की, "आम्ही ही संधी जाऊ देणार नाही. मी आता या विषयावर थोडा विचार करतोय. यासाठी माझ्या मोठ्या बहिणीकडून काही माहिती घेत आहे. माझी बहीण इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे."

पुढे ते म्हणाले की, चांद्रयान 3 वर बनवल्या जाणार्‍या चित्रपटात मिशन मंगलमध्ये काम करणाऱ्या टीमलाच घ्यायचे आहे. मात्र या सिनेमात अक्षय कुमार असेल का याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. असं असलं तरी त्यांनी अद्याप याबाबत अधिकृत काहीही माहिती शेयर केलेली नाही.

त्यांनी सांगितले की, या मोहिमेच्या यशानंतर लगेचच त्यांनी चित्रपट बनविण्याचा विचार सुरू केला आहे. मिशन मंगल बनवण्याचे काम सुरू झाले तेव्हा देखील त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत होता आणि विद्या बालनसह इतर अभिनेत्री देखील चित्रपटात दिसल्या होत्या.

2019 मध्ये आलेल्या मिशन मंगलमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नीती मेनन आणि शर्मन जोशी यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याने जगभरात सुमारे 290 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मागील चित्रपटाचा अनुभव किंवा चांद्रयान 3 ची क्रेझ मात्र जगन शक्ती यांना ही संधी सोडायची नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT