Madhavan says 'Chandrayaan-3 will be a success', congratulates  esakal
मनोरंजन

R.Madhvan Comment On Chandrayaan 3 : 'चांद्रयान ३ यशस्वी होणारच, पण यासगळ्यात....!' आर माधवननची प्रतिक्रिया चर्चेत

यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता आर माधवननं देखील ट्विट करुन चांद्रयान ३ च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Madhavan says 'Chandrayaan-3 will be a success', congratulates Nambi : भारतासाठी आजचा दिवस खास आहे. भारताच्या इस्त्रोनं मोठी ऐतिहासिक कामगिरी करुन साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचे चांद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासगळ्या घटनेवर वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेता आर माधवननं देखील ट्विट करुन चांद्रयान ३ च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यानं एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला आहे. चांद्रयान ३ तर यशस्वी होणारच पण यासगळ्यात एका व्यक्तीचे मोठे योगदान आहे आणि त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. असे माधवननं त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचे ते ट्विट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

चांद्रयान ३ मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आली आहे. त्यात आजचा दिवस या मोहीमेसाठी खूपच खास आहे. आज चांद्रयान ३ हे चंद्रावर लँड होणार असल्याचे इस्त्रोच्या वतीनं सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मोहीमेला अनेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माधवननं इस्त्रोचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ असणाऱ्या नंबी नारायणन् यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी विकास इंजिनची निर्मिती केली होती.

काही महिन्यांपूर्वी आर माधवनचा रॉकेट्री नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. त्यात नंबी नांबियार नावाच्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञाला कशाप्रकारे एका चूकीच्या आरोपाखाली देशद्रोही म्हणून ठरवले गेले याविषयी सांगण्यात आले होते. त्यात त्यांना किती अपमानकारक आणि भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागलं हे माधवननं प्रभावीपणे आपल्या चित्रपटातून दाखवून दिले होते.

माधवननं नांबियार यांची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुकही केले होते. सध्या माधवनच्या प्रतिक्रियेनं नांबियार यांच्याविषयीच्या घटनांना उजाळा देण्याचे काम अभिनेत्यानं केले आहे. माधवन त्या ट्विटमध्ये म्हणतो की, चांद्रयान ३ साठी विकास इंजिन बनवणाऱ्या नांबियार यांचे स्वागत. त्यांना खूप खूप धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT