Chatterjee had weekness, actress Sreelekha Mitra taunts Arpita Mukherjee sex toy seizure Google
मनोरंजन

Arpita च्या घरात सापडले सेक्स टॉईज,अभिनेत्री श्रीलेखाचा याविषयी मोठा खुलासा

पश्चिम बंगालची लोकप्रिय अभिनेत्री श्रीलेखा मित्रानं सोशल मीडियावर पोस्ट करत अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी यांच्याविषयी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

प्रणाली मोरे

पश्चिम बंगालधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून करोडोची रोख रक्कम,सोनं आणि अन्य किमती सामान जप्त करण्यात आले. ईडीच्या छापेमारीत तिच्या दोन फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये सेक्स टॉईज देखील जप्त करण्यात आले आहेत. यावर लोकप्रिय बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रानं अर्पिताविषयी मोठे खुलासे केले आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर मात्र चर्चेला उधाण आलं आहे.(Chatterjee had weekness, actress Sreelekha Mitra taunts Arpita Mukherjee sex toy seizure)

याविषयी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की ,अशा पद्धतीच्या वस्तूंचा करोडोच्या घोटाळ्याशी नेमका काय संबंध आहे? रोख रक्कम, सोनं आणि इतर किमती वस्तूंच्या तुलनेत हे सेक्स टॉईज खूपच क्षुल्लक वस्तू आहेत.

या दरम्यान आता बंगालची लोकप्रिय अभिनेत्री श्रीलेखा मित्रानं यासंबंधित केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणाली आहे की,''अर्पिता मुखर्जीच्या घरातून सेक्स टॉईज मिळाल्यामुळे पार्थ चॅटर्जीमध्ये वीकनेस होता हे समोर येत आहे''. श्रीलेखाने पोस्टमध्ये लिहिलं आहे,''पार्थ कुठे कमी पडले? देशाला हे जाणून घ्यायचं आहे''.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील 'शिक्षक भरती घोटाळा' या मोठ्या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर श्रीलेखा मित्राने दावा केला होता की जर तिनं मनात आणलं तर ती अर्पिता मुखर्जीशी संबंध असलेली अनेक मोठी नावं समोर आणू शकते. आता यावर देखील सोशल मीडियावर खूप संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. अनेकांनी ती स्वतःच्या फायद्यासाठी असं बरळतेय म्हणत तिला ट्रोल केलं. तर काहींनी तिच्या बोल्ड वक्तव्यांसाठी तिचं समर्थनही केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT