Riteish Deshmukh And Genelia Geshmukh
Riteish Deshmukh And Genelia Geshmukh 
मनोरंजन

Raja Shivaji: "ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं…"; शिवजयंतीनिमित्त रितेश आणि जिनिलियानं केली 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा

priyanka kulkarni

Riteish Deshmukh And Genelia Geshmukh: आज शिवजयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Geshmukh) यांनी त्यांच्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया यांनी केली आहे.

जिनिलियाची पोस्ट

जिनिलियानं 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं, "गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो.हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती.ही शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो."

रितेशची पोस्ट

रितेशनं देखील 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं, "इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला.एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी"

कधी रिलीज होणार चित्रपट?

2025 मध्ये ’राजा शिवाजी' हा चित्रपट प्रेक्षकांची भेटीला येणार असून या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT