Riteish - Genelia Deshmukh: 'तूझा विचार नाय करत' जिनिलिया वहिनी रागावल्या की काय? व्हिडिओ व्हायरल

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला
riteish deshmukh, genelia deshmukh, ved, Riteish - Genelia Deshmukh viral video, Riteish - Genelia Deshmukh family
riteish deshmukh, genelia deshmukh, ved, Riteish - Genelia Deshmukh viral video, Riteish - Genelia Deshmukh familySAKAL

Riteish - Genelia Deshmukh: जिनिलिया आणि रितेश देशमुख हे महाराष्ट्राचं फेव्हरेट कपल म्हणून ओळखलं जातं. रितेश आणि जिनिलिया अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे रिल व्हिडिओ अपलोड करत असतात.

रितेश आणि जिनिलियाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत मात्र रितेशवर जिनिलिया वहिनी नाराज झाल्यात का अशी चर्चा आहे.

(Is Genelia Deshmukh's angry on riteish deshmukh The video went viral)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

रितेश आणि जिनिलिया सध्या न्यू यॉर्कला फिरायला गेले आहेत. तिथे दोघांचा एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत रितेश जिनिलियाला विचारतो. मला माहितीये तू माझ्याविषयी वाईट विचार करतेस.. पुढे मग जिनिलिया तोंड वाकडं करत म्हणते. "वाईट...! अरे मी तुझ्याविषयी विचारच करत नाही." पुढे तोंड वाकडं करत जिनिलिया निघून जाते आणि रितेश जिनिलियाच्या उत्तराने निराश होतो. या दोघांचा हा रील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

riteish deshmukh, genelia deshmukh, ved, Riteish - Genelia Deshmukh viral video, Riteish - Genelia Deshmukh family
Parveen Babi Birthday: महेश भटच्या प्रेमात आकंठ बुडालेली परवीन.. पण या कारणाने होऊ शकलं नाही लग्न
riteish deshmukh, genelia deshmukh, ved, Riteish - Genelia Deshmukh viral video, Riteish - Genelia Deshmukh family
Bhagyashree Mote: दोन दिवसांपासून डोळ्यात झोप नाहीये, आता भाच्यांना मी.. बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीचा मोठा निर्णय

सगळ्या महाराष्ट्राला 'वेड' (Ved) लावणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. ३१ डिसेंबर २०२२ ला आलेल्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. हे दोघे सध्या न्यू यॉर्कला गेले आहेत. काहीच दिवसांपूर्वी दोघांनी न्यू यॉर्क मध्ये ओपन बसमध्ये प्रवास केला. London नहीं New York ही सही !!! खुली Bus पे… ये गाना तो बनता है! असं कॅप्शन रितेशने बसमधला व्हिडिओ शेयर केला होता.

वेडने दिवसेंदिवस कमाईचे नवीन आकडे मोडले. काहीच दिवसांपूर्वी वेडने थिएटरमध्ये ५० दिवस केले. वेडने आतापर्यंत ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय.

जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.

अशाप्रकारे सैराटननंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरल्याची शक्यता आहे. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झालीय.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड आवडला.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com