Chiranjeevi Angry On Mansoor Ali Khan comment on Trisha Krishnan esakal
मनोरंजन

Chiranjeevi Reaction : त्रिशाला बोलल्यावर चिरंजीवी चिडले, 'त्या मन्सूरला...'! पोस्टनं वेधलं लक्ष

चिरंजीवी यांनी एक्स वर पोस्ट करत त्रिशाच्या प्रकरणावर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

युगंधर ताजणे

Chiranjeevi Angry On Mansoor Ali Khan comment on Trisha Krishnan : साऊथ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यावर अभिनेता मन्सूर अली खाननं केलेली टिप्पणी ही वादाच्या भोवऱ्यात आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्यानं अनेकांचा राग ओढावून घेतला आहे. त्रिशाच्या या प्रकरणात आता प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांनी देखील मन्सूरचा चांगलाच समाचार घेतला आहे.

चिरंजीवी यांनी एक्स वर पोस्ट करत त्रिशाच्या प्रकरणावर सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महिला कलाकारांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आपण उभे राहणार. ठामपणे भूमिकाही घेणार, मन्सूरनं त्रिशाबाबत जे वक्तव्य केलं ते चूकीचे आहे. महिला कलाकारांचा अनादर करणारे आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. मी त्रिशाच्या बाजूनं उभा आहे. मी तिला पाठींबा देत आहे. असे चिरंजीवी यांनी म्हटले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

काय म्हणाला होता मन्सूर?

मला तेव्हा माहिती झाले की, मी त्रिशासोबत काम करणार आहे तेव्हा मला वाटले तो बेडरुम सीन असेल. मी त्रिशाला घेऊन बेडरुममध्ये जाईल आणि मी बाकीच्या अभिनेत्रींसोबत जे सीन केले तसेच मी तिच्यासोबतही करेन. मी पहिल्यांदा देखील असे सीन केले आहेत. ही काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती. या वक्तव्यामुळे मन्सूर अली खान चर्चेत आला आहे.

मन्सूर अलीनं माफी मागण्यास दिला नकार...

सोशल मीडियावर मन्सूर अलीच्या त्या विधानानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यावर त्यानं पुन्हा प्रतिक्रिया देत आपल्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. आपण जे बोललो त्यामागील संदर्भ वेगळा होता. मला महिला कलाकारांबाबत आदर आहे. मी तो केला आहे. पण आता राजकारण करत माझे करिअर संपविण्याचा प्रकार होत असल्याचे मन्सूरचे म्हणणे आहे.

मन्सूरनं एका पत्रकार परिषदेमध्ये आपण माफी मागणार नाही. असे ठामपणे सांगितले. मला माझी बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. नदिगर संगम यांनी मला आणखी एक संधी द्यायला हवी. ते मोठी चूक करत आहेत. तुम्ही चित्रपटात बलात्काराचे सीन केले म्हणजे ते खऱ्या आय़ुष्यातही तसेच वागता असा अर्थ होत नाही. असे मन्सूरनं म्हटले आहे.

प्रख्यात अभिनेता चिरंजीवीनं यावर म्हटले आहे की, मन्सूर सारख्या अभिनेत्यांकडून तुम्ही माफीची अपेक्षा करु शकत नाही. ते नेहमीच अशा प्रकारचे वर्तन आणि प्रतिक्रिया देत असतात. पैसा आणि प्रसिद्धीमुळे ते काहीही बोलू लागतात. काही व्यक्तींना आपण अशाप्रकारचे वक्तव्य करुन खूप मोठी कामगिरी केली असे वाटते. असे अभिनेत्यानं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT