chiranjeevi 
मनोरंजन

मेगास्टार चिरंजीवी कोरोना व्हायरसने संक्रमित नाहीत, पहिल्या टेस्टमध्ये कोरोना पॉझिटीव्ह येण्याचं 'हे' होतं कारण

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- साऊथ सिनेमाचे मेगास्टार चिरंजीवी यांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र आता त्यांनी सांगितलंय की त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट चुकीचा होता ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान केलं गेलं होतं. आता चिरंजीवी यांनी सांगितलंय की त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.  त्यामुळे एकंदरीतंच आता लोकांमध्ये याविषयी आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

अभिनेते चिरंजीवी यांनी स्वतः याबाबत सोशल मिडियावर माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं म्हटलंय. त्यांनी लिहिलंय, 'डॉक्टरांच्या ग्रुपने माझ्या तीन वेगवेगळ्या टेस्ट केल्या आणि आता मी कोविड-१९ निगेटीव्ह आलो आहे. पहिली टेस्ट एका खराब आरटी पीसीआर किटने तपासणी केल्याने पॉझिटीव्ह आढळून आली होती त्यामुळे तो रिपोर्ट चुकीचा होता.'

चिरंजीवी यांनी त्यांची काळजी करणा-या आणि लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलंय, 'या दरम्यान तुमच्याकडून दाखवल्या गेलेल्या प्रेमासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतोय.' 

याआधी चिरंजीवी यांनी ट्विट करत 'आचार्य' सिनेमाच्या शुटींगआधी कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहत्यांना धक्का बसला होता. सोशल मिडियावर चिरंजीवी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे हॅशटॅग्स ट्रेंड झाले होते.    

chiranjeevi has tested covid 19 negative now clarifies his earlier result was false positive  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT