Actor Chiranjeevi released a special video message esakal
मनोरंजन

Chiranjeevi Padma Vibhushan Honour: 'पद्मविभुषण' मिळाल्यानंतर अभिनेते चिरंजीवी भावूक, दिली खास प्रतिक्रिया! काय म्हणाले?

दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख प्रस्थापित केलेल्या अभिनेत्यांमध्ये चिरंजीवीचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Actor Chiranjeevi released a special video message : दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख प्रस्थापित केलेल्या अभिनेत्यांमध्ये चिरंजीवीचे नाव घ्यावे लागेल. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी त्यांच्या अभिनयानं चाहत्यांची अमाप पसंती मिळवली आहे. या सगळ्यात आता एक मानाचा तुरा चिरंजीवी यांच्या शिरपेचात खोवला गेला आहे.

टॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये चिरंजीवींचे नाव घ्यावे लागेल. त्यांना आता भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक अशा पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर चिरंजीवी यांची प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी भावूक होत आपली भावना व्यक्त केली आहे.

एक्स वर चिरंजीवी यांनी कला क्षेत्रातील ज्या मान्यवरांना पद्म भूषण आणि पद्मविभुषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले त्यांच्या नावांचा उल्लेख करुन त्यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेयर केली आहे. तसेच त्यांनी स्वत: देखील पद्मविभुषण मिळाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया, चाहते,नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत.

चिरंजीवी यांनी व्हिडिओ शेयर करुन त्यात म्हटले आहे की, मी खरं तर हा पुरस्कार मिळाल्यानंतर खूपच भावूक झालो आहे. हा माझ्यासाठी खूपच मोठा क्षण आहे. मी माझ्या चाहत्यांचे, मित्रांचे आणि माझ्या परिवाराचे सगळ्यांचे आभार मानतो. यात त्यांचे योगदान खूपच मोठे आहे. मला माहिती आहे मी जे आभार मानतो आहे ते पुरेसे नाहीत पण मी नेहमीच सगळ्यांप्रती कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न केला आहे.

यापुढील काळात देखील मी अधिक उर्जेनं चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा आणि त्या क्षेत्रात मोठे योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईन असेही चिरंजीवी यांनी म्हटले आहे. मी आतापर्यत जे काही केले आहे ते खूपच कमी आहे. त्यातून मला जी प्रसिद्धी मिळाली त्यात मी माझे भाग्य समजतो.

या सगळ्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय सरकार यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पद्मविभुषण पुरस्कारासाठी योग्य समजले त्याबद्दल. धन्यवाद, जय हिंद...अशा शब्दांत चिरंजीवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना पद्म भुषण आणि पद्मविभुषणनं गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT