Chotya Bayochi Motthi Swapna new serial on sony marathi cast veena jamkar and ruchi nerurkar  sakal
मनोरंजन

शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास; 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' नवी मालिका..

सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही नवी मालिका

नीलेश अडसूळ

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असते. शिक्षणासाठीची जिद्द, आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे. या मालिकेचे विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित होणारी ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्यं, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे. (Chotya Bayochi Motthi Swapna new serial on sony marathi cast veena jamkar and ruchi nerurkar)

'शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस' असं ब्रीदवाक्य असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

पाहा, 12 सप्टेंबरपासून सोम.-शनि., रात्री 8.30

या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हिनी साकारली आहे. मूळची कोकणातली असलेली रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष ठरेल.

तर मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. तर 'इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ' असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल. 12 सप्टेंबर पासून ही मालिका सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT