Chrisann Pereira drug case Release likely in 2 weeks, says family  sakal
मनोरंजन

Chrisann Pereira: क्रिसॅन परेराचं भारतात येणं मुश्किल.. ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेल्या अभिनेत्रीबाबत मोठी अपडेट..

'क्रिसॅन परेरा'चं भारतात येणं आता चांगलंच लांबणीवर गेलं आहे.

नीलेश अडसूळ

Chrisann Pereira drug case: 'सडक 2' चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री क्रिसॅन परेराला(Chrisann Pereira) अटक झाली होती. क्रिसॅनला ड्रग्ज प्रकरणी शारजाह तुरुंगात ठेवण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी तिची तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी ती ४८ तासात भारतात परतण्याची शक्यता वर्तवली होती. पण त्याला आता चांगलाच विलंब होत आहे.

क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत अनेकजण वाटत होते. पण आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून तिच्या कुटुंबियांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.

(Chrisann Pereira drug case Release likely in 2 weeks, says family)

क्रिसॅनच्या कुटुंबियांनी सांगितले की,  'सध्या क्रिसॅन तिथ काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ती भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे परत येण्यासाठी तिला कमीत-कमी दोन ते जास्तीत जास्त तीन आठवडे लागू शकतात.  एका सर्व प्रक्रिया पार पडली की तुम्हा सर्वांना आम्ही तिच्या परत येण्याची तारीख नक्की सांगू. ती भारतात सुखरूप परत येईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना करा.' असे ते म्हणाले आहेत.

 झाले असे की, क्रिसन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी  तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे.

आणि पुढे शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला अटक करण्यात आली. नंतर तिला शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, तिला ट्रॉफी देणारा अँथोनी पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे . सध्या क्रिसॅन सुटली असली तरी मुंबई गुन्हे शाखेने  क्रिसॅनला ड्रग प्रकरणात अडकवणाऱ्या आरोपी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना अटक केलं असून ते पोलीस कोठडीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT